नागपूर – “करोना’बाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग दिल्लीसह देशातील सात विमानतळांवर सुरू असतांना नागपूरमध्ये कोरोना विषाणूचा रुग्ण आढळले होते.
या रुग्णांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डात संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते. मात्र मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले करोनाचे पाच संशयित रुग्ण पळाल्याने खळबळ उडाली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार,या रुग्णांना मेयो हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्डात संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे या वॉर्डात करोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली.
तसेच त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले. मेयो प्रशासनाला ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. चारही रुग्ण घरी असल्याचे कळताच मेयो प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, पोलिसांना पाचपैकी तिघेजण त्यांच्या घरी आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्यांना शनिवारी रुग्णालयात पुन्हा परतण्याची विनंती केली. हे सर्वजण स्वच्छतागृहाला जाण्याच्या बहाण्याने एकापाठोपाठ एक रुग्णालयातून बाहेर पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या पाच संशयितांमध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे.