नागपूर – काटोल विधानसभा पोटनिवडणूकीला अंतरिम स्थगिती देण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
अडीच ते तीन महिन्यासाठी निवडणूक घेऊन प्रशासन आणि उमेदवारांचे पैसे वाया जाऊ नये यासाठी भाजपने निवडणूक रद्द करण्यासाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. भाजपच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी ही पोटनिवडणुक रद्द करण्यासाठी समर्थन दिले होते. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला आहे.
#Maharashtra: Nagpur bench of Bombay High Court stays Katol assembly bypoll scheduled to be held next month.
— ANI (@ANI) March 19, 2019
दरम्यान, १५ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या सर्वसाधारण विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघातून आशिष देशमुख विजयी झाले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. दरम्यान, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ३ ऑक्टोबर २०१८ रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. ६ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांच्या राजीनामा मंजूर झाला. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.