ब्रम्हास्त्र या बिग बजेट चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बड्या स्टार्सचा भरणा असलेल्या अयान मुखर्जी यांचा प्रोजेक्ट ब्रम्हास्त्रमधील पात्रांची एकामागून एक ओळख करून देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा या चित्रपटातील लूक रिव्हील करण्यात आला होता.
यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्या ब्रम्हास्त्रमधील लूकची झलक दाखवण्यात आली आहे.
करण जौहर यांनी नागार्जुन यांचा लूक आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर पोस्ट केला आहे. ‘सहस्र नंदी हैं भुजबल जाके अंधकार भी थर थर कांपे हाथों में जिसके है हज़ारों नंदियों का बल.’ अशा शब्दांमध्ये करणने नागार्जुन यांच्या चित्रपटातील भूमिकेबाबत ओळख करून दिली आहे. नागार्जुन हे नंदीची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.
दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असलेल्या ब्रम्हास्त्रचा पहिला भाग शिवा 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
ब्रम्हास्त्रची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर येत्या 15 जूनला रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती करणने दिली आहे. चित्रपटामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.