नगर झेडपीची मेगा नोकर भरतीची प्रक्रिया सुरू

-729 रिक्‍त पदे भरणार
-16 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार

नगर – गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या मेगा नोकर भरतीला अखेर शासनाने मान्यता दिली असून उद्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील तब्बल 729 जागांची भरती होणार आहे. त्यासाठी 26 मार्चपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 16 एप्रिलपर्यंत हे अर्ज भरता येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील रिक्‍तपदे भरण्यात येणार आहे. त्यात अनुसुचित क्षेत्राबाहेरील 698 पदे असून अनुसूचित क्षेत्रातील पेसामधील 31 अशी 729 पदे भरण्यात येणार आहे.

त्यात आरोग्य सेवक (हंगामी फवारणी उमेदवारांमधून) 118, आरोग्यसेवक (सर्वसाधरण) 82, औषधेनिर्माता 13, आरोग्यसेवक महिला 329, अंगणवाडी पर्यवेक्षिका 8, विस्तार अधिकारी कृषी 2, विस्तार अधिकारी साख्यिंकी 1, विस्तार अधिकारी महिला व बालकल्याण 2, प्रयोगशाळातज्ज्ञ 3, कंत्राटी ग्रामसेवक 65, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 48, वरिष्ठ सहाय्यक लिपिक 11, वरिष्ठ सहाय्यक लेखा 12 व कनिष्ठ लेखाधिकारी 4 असे 698 पदांसह पेसातील आरोग्य सेवक (हंगामी फवारणी उमेदवारांमधून) 1, आरोग्यसेवक (सर्वसाधरण)6, आरोग्यसेवक महिला 23, अंगणवाडी पर्यवेक्षिका 1 असे 21 असे एकूण 729 रिक्‍त पदाची भरती होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)