विखे पाटील-थोरात मनोमिलन फेल!

नगर : राफेल विमान खरेदीची चौकशी, महागाई, इंधन दरवाढीवरून कॉंग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

कॉंग्रेसचा नगरमध्ये मोर्चा : राफेल विमान खरेदी व महागाईवरून सरकार निशाण्यावर

नगर  – राफेल विमान खरेदीत सरकार फेल ठरले आहे. इंधन दरवाढी रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याने महागाई उच्चांक गाठत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होम गाऊंडवर सरकार घेरला घेरत होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यासाठी कॉंग्रेसने विराट मोर्चा आणला होता. परंतु कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ऐनवेळी मोर्चाकडे पाठ फिरवली. थोरात यांची ही अनुपस्थिती मात्र भाव खाऊन गेली. विखे पाटील-थोरात यांच्यातील मनोमिलनाचे सर्व प्रयत्न फेल ठरल्याचीच चर्चा कॉंग्रेसच्या विराट मोर्चापेक्षा रंगली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने केलेल्या विमान खरेदीच्या चौकशीसाठी, महागाई रोखण्यासाठी आणि इंधन दरवाढीच्या विरोधात जाब विचारण्यासाठी जिल्हा कॉंग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन केले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे या मोर्चाचे नेतृत्व करणार होते.

थोरात गटाने समाज माध्यमांवर संदेश पाठवून या मोर्चाचे नेतृत्व बाळासाहेब थोरात करत आहे असे निरोप दिले होते. परंतु बाळासाहेब थोरात यांनी ऐनवेळी मोर्चाकडे पाठ फिरवली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोर्चाची सूत्रे स्वीकरली. यामुळे विखे पाटील आणि थोरात यांचे मनोमिलन फेल ठरल्याची चर्चा मेर्चात रंगली होती. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या चर्चेला उघड पुष्टी दिली. या दोघां नेत्यांमध्ये कॉंग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ता भरडला जातोय, अशी प्रतिक्रिया नगरमधील एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी व्यक्त केली.

राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. सरकार या व्यवहारात फेल ठरले आहे. अंबानीची यांची दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीमार्फत ही विमान खरेदी झाली आहे. या खरेदीची सर्वपक्षीय संसद समितीमार्फत चौकशी करण्यास मोदी सरकार घाबरत आहे. इंधन दरवाढीवर उपाययोजना करण्यात सरकार दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकार देखील यात पुढे आहे. दुष्काळ निर्वारणासाठी लावलेला कर कमी केल्यास राज्यात इंधनाचे दर दहा ते 20 रुपयांनी कमी होऊ शकतात. राज्य सरकार हे देखील करायला तयार नाही. जनतेचे शोषण या सरकारने चालविले आहे.
– राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेता

माळीवाडा बसस्थानकाजवळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरूवात झाली. मार्केट यार्ड चौकात मोर्चा आल्यावर तिथे राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विखे पाटील यांनी पुष्पहार घातला आणि ते मोर्चात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येताच कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाला संबोधित करताना विखे पाटील यांनी भाजप सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टिका केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मोर्चातील शिष्टमंडळाने जाऊन निवेदन दिले.

आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, बाळासाहेब हराळ, सभापती राहुल झावरे, अंबादास पिसाळ, वसंतराव कापरे, निखील वारे, बाळासाहेब पवार, धनंजय जाधव, प्रताप शेळके, उबेद शेख, विनायक देशमुख, प्रताप शेळके, सविता मोरे, कांचन मांढरे आदी मोर्चात सहभागी झाले होते.

आमदार कांबळे यांचे पाकिट चोरीला

आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या खिशातील पाकिटावर चोरांनी मोर्चात हातसफाई केली. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आल्यानंतर शिष्टमंडळ पुन्हा मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आमदार कांबळे यांचे चोरांनी पाकिट मारले. पाकिटात सुमारे पाच हजार रुपये होते, असे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)