नगर – कोठला ते छत्रपती संभाजीनगर रोडवर मालवाहू टेम्पोतून विनापरवाना लपवून दारूची वाहतूक करणाऱ्यास भिंगार पोलिसांनी जेरबंद केले. दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड (रा. वडुले बुद्रुक, ता. शेवगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयशर टेम्पोतून विदेशी दारुची विनापरवाना वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून पांढऱ्या रंगाचा आयशर कंपनीचा टेम्पो (एमएच १६ सीसी ८६०४) छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना मिलिटरी मस्जीद जवळ थांबवला.
गाडीतील मालाची तपासणी केली असता ट्रान्सपोर्टच्या मालाच्या खाली लपवलेले विविध कंपनीचे विदेशी दारुचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी दारूच्या बॉक्ससह आयशर टेम्पो असा ६ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.