बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीमुळे शहर जाम

प्रातिनिधिक छायाचित्र

दोन ते अडीच महिन्यांनी होणार रस्ता वाहतूकीसाठी खुला

नगर – रस्त्याच्या विशेष दुरुस्तीमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बाह्यवळण रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने त्याचा वाहनांचा ताण शहरातील रस्त्यावर पडला आहे. परिणामी शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीने नगरकर हैराण झाले आहेत. अवजड वाहतूक शहरातून होत असल्याने सर्वच रस्त्यावर मोठी वर्दळ वाढली आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढतांना प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या तरी दोन- अडीच महिने हा त्रास नगरकरांना सहन करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाह्यवळण रस्त्याच्या विशेष दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यात मध्यतंरी झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाल्याने हे काम संथगतीने सुरू आहे. सध्या मजबुतीकरणाचे काम निम्म्यापेक्षा जास्त झाले आहे. डांबरीकरण झाल्यानंतर हा रस्ता वाहतूकीसाठी खुला होणार आहे. तोपर्यंत अवजड वाहतूक शहरातून धावणार आहे. ऐन सणासुदीला वाहतूक कोंडीला नगरकरांना तोंड द्यावे लागत आहे.

रस्त्याचा विळदघाट ते वाळूंज असा 29 किलोमीटर रस्ता खराब झालेला आहे. त्याची विशेष दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्यानंतर गेल्या जून महिन्यात रस्त्याच्या कामाला सुरू झाली. बाह्यवळण रस्त्यावर सध्या एकेरी वाहतूक होत आहे. परंतू या रस्त्यावर खड्डेच मोठे असल्याने वाहनधारक या बाह्यवळण रस्त्याऐवजी शहरतील राज्यमार्गावरून जाणे पसंत करीत आहेत.

त्यातही वाहतूक नगर शहरातून वळविण्यात आली. त्यासाठी वाहतूक वळविण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार पुण्याकडून केडगाव बाह्यवळणमार्गे विळद घाट पायथ्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. निंबळक चौक ते विळद घाट पायथा या दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात आली. सोलापूरकड़ून येणारी अवजड वाहतूक वाळूंज बाह्यवळणमार्गे केडगाव बाह्यवळणवरून विळद घाट पायथ्याकडे जाणारी वाहतूक निंबळक चौक ते विळद घाट दरम्यान एकेरी करण्यात आली आहे.

विळद घाट पायथ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक निंबळक चौक ते विळद घाटदरम्यान एकेरी करण्यात आली, तर विळद घाट पायथ्याकडून निंबळकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
या बदलामुळे औरंगाबादकडून पुण्याकडे, मनमाड महामार्गावरून पुणे, सोलापूरकडे जाणारी वाहतूक नगर शहरातून जात आहे. नगर शहरातून जाणारे कंटेनर, मालट्रक व इतर वाहनांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे अपघात देखील वाढले आहे.

सध्या प्रमुख चौकांमध्ये कोंडी वाढली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यात शहरातून मोठी अवजड वाहतूक होत असल्याने धूराचे लोट वाढले आहेत. या वाहनातून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असून नागरिकांना श्‍वसनाचा त्रास सुरू झाला आहे. कोंडीच्यावेळी वाहनामधून फेकल्या जाणाऱ्या धूराच्या लोटामुळे दम्याचे आजार वाढले आहेत. सध्या केडगाव ते निंबळक या पाच किलोमीटर मजबुतीकरण पूर्ण झालेले आहे. विळद घाट पायथा ते निंबळक चौकापर्यंत पाच किलोमीटर अंतराच्या मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात आले.

पाऊस थांबल्यास येत्या महिन्याभरात मजबुतीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. परंतु, नियमाप्रमाणे पावसाळ्यात डांबरीकरण करता येत नाही. त्यामुळे सप्टेंबर महिना संपल्यानंतर ऑक्‍टोबर महिन्यात डांबरीकरण केल्यानंतर बाह्यवळण रस्ता खुला होणार आहे. या कामांसाठी दोन महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने आणखी दोन महिने नगरकरांना अवजड वाहनांचा सामना करावा लागणार आहे.

प्रमुख चौकात कोंडी

शहरातील प्रमुख चौकात ही कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मार्ग काढणे अवघड होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चौक, कोठला चौक, चांदणी चौक, इपिरियल चौक, सक्‍कर चौक, कायनेटिक चौक, प्रेमदान चौक, पत्रकार चौक या चौकांमध्ये वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)