नगर : संसर्गाच्या आलेखला पुन्हा चढती कमान

आज पुन्हा 4 हजार बाधित रुग्ण सापडले

नगर : नगर जिल्ह्यात मागील दोन दिवसांत रुग्णसंख्या घटतीकडे सुरु झाल्याने नगरकरांना हायसे वाटले होते. मात्र, आज पुन्हा एकदा करोना संसर्गाने तडाखा देत आलेख उंचाविला आहे. नव्या करोनाबाधितांची संख्या आज पुन्हा चार हजार पार झाली आहे. त्यामुळे करोना नगर शहर व जिल्ह्यात सापशिडीचा खेळ करत असल्याचे पुन्हा पुन्हा दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यात आज 2, 086 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 83 हजार 171 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 86.85 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 4059 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 27 हजार 865 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 2 हजार 81, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1356 आणि अँटीजेन चाचणीत 622 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 84, अकोले 183, जामखेड 95, कर्जत 60, कोपरगाव 18, नगर ग्रामीण 201, नेवासा 189, पारनेर 106, पाथर्डी 190, राहता 176, राहुरी 101, संगमनेर 190, शेवगाव 281, श्रीगोंदा 69, श्रीरामपूर 92, कँटोन्मेंट बोर्ड 14, मिलिटरी हॉस्पिटल 11 आणि इतर जिल्हा 21 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 184, अकोले 60, जामखेड 03, कर्जत 18, कोपरगाव 68, नगर ग्रामीण 152, नेवासा 53, पारनेर 59, पाथर्डी 32, राहाता 122, राहुरी 37, संगमनेर 393, शेवगाव 15, श्रीगोंदा 25, श्रीरामपूर 87, कँटोन्मेंट बोर्ड 07 आणि इतर जिल्हा 41 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 622 जण बाधित आढळुन आले. मनपा 16, अकोले 17, जामखेड 13, कर्जत 79, कोपरगाव 68, नगर ग्रामीण 24, नेवासा 69, पारनेर 55, पाथर्डी 50, राहाता 19, राहुरी 58, संगमनेर 11, शेवगाव 10 श्रीगोंदा 103, श्रीरामपूर 26, कँटोन्मेंट 01 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 411, अकोले 266, जामखेड 14, कर्जत 101, कोपरगाव 78, नगर ग्रामीण 193, नेवासा 72, पारनेर 133, पाथर्डी 92, राहाता 118, राहुरी 111, संगमनेर 103, शेवगाव 127, श्रीगोंदा 84, श्रीरामपूर 116, कॅन्टोन्मेंट 32, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 31 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

करोना अपडेट्स
– बरे झालेली रुग्ण संख्या : 1,83,171
– उपचार सुरू असलेले रूग्ण : 27865
– जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 2338
– एकूण रूग्ण संख्या : 2,13,374

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.