पारनेर : पारनेर येथील श्री साई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव अॅग्रीकल्चर सोसायटी लि. पारनेर या पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीपोटी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी अतिरिक्त न्यायदंडाधिकारी आर.डी.गवई यांनी पारनेर येथील संतोष सुदाम खोसे यांना चार महिने तुरुंगवास व ६० हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
संतोष सुदाम खोसे यांनी श्री साई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अॅग्रीकल्चर सोसायटी लिमिटेड, पारनेर या पतसंस्थेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सदर कर्ज थकीत झाले असता कर्जदार यांनी थकीत रकमेच्या परत फेडीपोटी दिलेला धनादेश न वटता परत आला.
नोटीस देऊन देखील आरोपीने धनादेशाची रक्कम अदा न केल्याने संतोष सुदाम खोसे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. सदर प्रकरणांमध्ये पतसंस्थेचे ॲड. वर्षा रामदास औटी, ॲड.योगेश भालेकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड.अवधूत टेकाळे व ॲड.प्रशांत बडे यांनी सहकार्य केले. संस्थेचे माहितगार इसम म्हणून दत्तात्रय पवार यांनी काम पाहिले.