तमिळनाडूतील आंतरराज्यीय टोळी गजाआड

डॉ. दीपक यांचे चोरलेले साहित्य तोफखाना पोलिसांकडून जप्त

नगर – शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी तोफखाना पोलिासंनी गजाआड केली आहे. ही सहा जणांची टोळी तामिळनाडूची असून, तिने नगरमधील प्रसिद्ध डॉ. एस. एस. दीपक यांच्या मोटारीतून दोन बॅगांची चोरी केली होती. टॅप, आयपॅड आणि मोडमचा यात समावेश असल्याने आणि तिचा वापर या टोळीतील आरोपींनी केल्याने हा टोळीचा छडा लागला. तोफखाना पोलिसांनी या टोळीतील सहा जणांना न्यायालयासमोर हजर केले असताना त्यांना उद्यापर्यंत (ता. 29) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोजराज सतीश (वय 33), मुरगन कन्नन (वय 29), मुरगन प्रभाकरन (वय 33), मुरगन सायवेल (वय 20), लक्ष्मण नारायणन (वय 40), विजय सीतारामन (वय 57, सर्व रा. श्रीरंगम, तामिळनाडू) असे अटक केलेल्यांची नावे आहे. या टोळीकडून डॉ. दीपक यांचा आयपॅड, टॅप आणि मोडम जप्त करण्यात आले आहे. या टोळीला तमिळनाडू पोलिसांनी बेलमपल्ली (जि. मच्युुरिअल) येथे अटक केली होती.

तमिळनाडू पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेल्या साहित्यावरून तोफखाना पोलिसांना तिचा छडा लागला. पोलीस निरीक्षक संपत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेंद्र खोंडे, हनुमंत आव्हाड, विक्रम वाघमारे व ज्ञानेश्‍वर मोरे यांनी तिथे जाऊन या टोळीला ताब्यात घेतले. रेल्वेने प्रवास करत या टोळीला नगरमध्ये आणण्यात आले आहे. या टोळीने डॉ. दीपक यांच्या मोटरगाडीतून 12 जुलैला दोन बॅग चोरी केल्या होत्या. मोटरगाडीतील वाहकाला त्यांनी खाली पैसे पडले असल्याचे सांगून त्याची दिशाभूल करत ही चोरी केली होती. भर दुपारी ही चोरी झाली होती.

दरम्यान, तोफखाना पोलिसांनी अटक केलेली ही टोळी आंतरराज्यीय आहे. ही टोळी रेल्वे मार्गावरील शहरे, गावे आणि निमशहरांमध्ये थांबून चोरी करते. दिल्लीपासून ते तामिळनाडूपर्यंत तिचा वावर आहे. चोरी केल्यानंतर टोळीतील एकाला मुद्देमाल किंवा रोख रक्कम घेऊन पुढे पाठवून दिले जाते. टोळी जेव्हा तामिळनाडूमध्ये पोहचते तेव्हा मुद्देमालाचे आपआपसात वाटून घेतला जातो. टोळीतील काहीं जणांचे मोठमोठाले बंगले आहेत. ही टोळी पोलिसांची माहिती काढण्यासाठी गावातील महिलांचा खबरीचा म्हणून वापर करत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचता येत नव्हते, अशी माहिती सहायक फौजदार राजेंद्र खोंडे यांनी दिली.

“ही आंतरराज्यीय टोळी आहे. तिने नगर जिल्ह्यातील काही ठिकाणी गुन्हे केल्याची माहिती समोर येत आहे. टोळीतील काही जणांना अटक व्हायची आहे. त्यानुसार तपास सुरू आहे. टोळीशी संवाद साधताना अडचणी येत आहे. हा अडथळा भाषाचा आहे. तो दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – संपत मोरे, पोलीस निरीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)