आ. औटी लाटताहेत पाणीयोजनेचे श्रेय

कडूसच्या सरपंच पूनम मुंगसे यांचा आरोप

सुपे -पिण्याच्या पाण्यासाठी सातत्याने टॅंकरवर अवलंबून असणाऱ्या पारनेर तालुक्‍यातील कडूस गावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा लवकरच संपनार आहे. विसापूर जलाशयातून राबवण्यात येणाऱ्या सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. यासाठी 94.42 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला; मात्र तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवती तालुकाध्यक्ष, कडूसच्या सरपंच पूनम मुंगसे यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कडूस ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.

ग्रामपंचायतीच्या वतीने कडूस गावाची राष्ट्रीय पेयजल योजनेत सामावेश व्हावा, यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. यासाठी खासदार दिलीप गांधी व भाजप तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी मोलाचे प्रयत्न केले असल्याचेही मुंगसे यांनी सांगितले. कडूस गावासाठी सध्या पाडळी रांजणगाव येथील तलावालगत असणाऱ्या सार्वजनिक विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो; मात्र दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने दरवर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते.

ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत होते; मात्र ती प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. कडूस गावासाठी पूर्वेला असणाऱ्या विसापूर जलाशयातून सुमारे 12 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 1650 लोकसंख्या असणाऱ्या कडूस गावाला आता टॅंकरपासून मुक्ती मिळणार आहे. माजी सरपंच भीवसेन मुंगसे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे मुंगसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)