नगर-सोलापूर रस्त्यावर ट्रक चालकाला लुटले

file photo

भिंगार – नगर-सोलापूर रस्त्यावरील भिंगार नाल्यापुढील मुठ्ठी चौकात ट्रक चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून दहा हजार रुपयांना लुटल्याची घटना झाली आहे. बाप्पासाहेब आप्पाराव चव्हाण (वय 29, रा. तळेगाव, जि. बीड) यांच्याबाबत हा प्रकार झाला आहे. ट्रकला दुचाकी आडवी घालून तिघा लुटारूंनी हा प्रकार केला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, बाप्पासाहेब यांनी चोरांनी बरोबर आणलेल्या दुचाकीचा क्रमांक पहिला होता. कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप पाटील यांना त्याची माहिती देताच त्यांनी तपास सुरू केला. दुचाकीचा मालक महेश बकरे (रा. सदरबाजार, भिंगार) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही दुचाकी बकरे याने तीन वर्षापूर्वी सोलापूर रोडवरील प्रकाश दशरथ भिंगारदिवे (रा. फऱ्याबाग) याला विकल्याचे सांगितले. प्रकाशचा शोध सुरू केल्यावर तो घरी मिळाला नाही. प्रकाशचा शोध घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी परिसरातील खबऱ्यांना अलर्ट केले. त्यानंतर प्रकाशचा शोध लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकाशकडे विचारपूस केल्यावस त्याने गुन्ह्याची माहिती दिली. संदीप परशुराम वाकचौरे (रा. दरेवाडी, सोलापूर रोड) याला ताब्यात घेतले. संपदीला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी सौम्य बळाचा वापर करत त्याला ताब्यात घेतले. या चोरांकडून पोलिसांनी लुटीतील मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)