शनिशिगणापूर : राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रेला राज्य परिवहन महामंडळाकडून बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. तशी बस सेवा श्री क्षेत्र शनिशिंगणापूर ते श्री.क्षेत्र तुळजापूर सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी जालिंदर येळवंडे यांनी केली आहे.
नेवासा तालुक्यातून अनेक भाविक शनिशिंगणापूरला शनि दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविकांना श्रीक्षेत्र तुळजापूरला जाण्यासाठी जर ही बस सुरू झाल्यास भाविकांना नक्कीच फायदा होईल.
तसेच परिसरातील बरीचशी गावे आणि येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता ही बस सर्वांनाच हिताच ठरेल. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने शनिशिंगणापूर ते तुळजापूर ही बस तत्काळ सुरू करण्याची मागणी येळवंडे यांनी केली.