ढोलताशाच्या गजरात शेवगावात ‘श्री’ ला निरोप

शेवगाव – तालुक्‍यासह शेवगाव शहरात अत्यंत भावपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी श्री गणरायाला निरोप देण्यात आला. मानाच्या अखेरच्या श्रींच्या मूर्तीचे रात्री 12 वाजता विसर्जन झाले. यावेळी पारंपारिक ढोल ताशे आणि बॅंडच्या तालावर चौकाचौकांत मंडळाचे झांज, लेझीम व गोफचे डाव चांगलेच रंगले. मिरवणुका शांततेत पार पडल्या.

शेवगाव तालुक्‍यात 124 तर शहरात 41 मंडळानी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. त्यातील शहरातील काही मंडळांनी सातव्या, काहींनी नवव्या दिवशी तर काही मंडळांनी स्वतंत्र मिरवणुकीने दुपारीच श्रींचे विसर्जन केल्याने मुख्य मिरवणूकीत सहा मंडळे सहभागी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील गणेश मंडळांस ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. गणपतराव जाधव यांच्या पेशवेकालीन गणपतीची व 1895 मध्ये स्थापना असलेल्या लाटे गणेश मंडळांच्या पहिल्या मानाच्या श्रींची दुपारी 4 वाजता तहसिलदार विनोद भामरे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नगरपरिषदेचे नगरसेवक अरुण मुंढे आदींच्या हस्ते आरती करुन गणेश मूर्तीचे उत्थापन करण्यात आले. त्यानंतर मुख्य मिरवणूकीस प्रारंभ झाला.

या मिरवणुकीत लाटे गणपती मागे अनुक्रमे मानाचा दसरा भोईराज, तिसरा मानाचा शिवशक्ती, व चवथा मानाचा भगतसिंग मंडळाचा त्यानंतर जय बजरंग व लोकमान्य टिळक अशी सहा मंडळे सहभागी झाली होतो. स्वराज, संकल्प, राजमुद्रा, युवाशक्ती, साई, क्रांती प्रतिष्ठाण, एस.टी चालक मालक, शिवगर्जना, संघर्ष युवा, हनुमान, अचानक, आदींसह शहरातील अन्य मंडळांच्या श्रींच्या मूर्तींचे सकाळपासूनच स्वतंत्र मिरवणुकीने शहरातील बारवेत तर काहींनी जोहरापूर येथील ढोरा नदीवर विसर्जन केले.

श्रींच्या मिरवणुकीत, ढोल, लेझीम पथक, झांजरी, बॅंन्जो पथक, डोली बाजाचे खास आकर्षण होते. हे मंडळांचे विविध डाव पाहण्यासाठी शेवगावकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मिरवणुकीमध्ये उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेक सागर फडके, अरुण मुंढे, दिगंबर काथवटे, महेश लाटे, अचल लाटे, अनंता लाटे, अंकुश कुसळकर, नवनाथ कवडे, दिगंबर काथवटे, राजू काथवटे, सखाराम कुसळकर, राजू कुसळकर, संजय फडके, अजिंक्‍य लांडे, तुषार पुरनाळे, सुनिल रासने, एजाज काझी, गणेश साळवे, संदीप शिंदे, किरण पुरनाळे, पप्पु परदेशी, किरण पवार आदी कार्यकर्ते मिरवणुकीत सक्रीय होते. मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर, राजू केदार, बाळासाहेब ताके, रवींद्र शेळके गुप्तवार्ताचे राजु चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)