एरंडगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ‘मनसे’चे भागवत

लाखेफळच्या प्रथम सरपंचपदी सविता सोनवणे

शेवगाव – तालुक्‍यातील एरंडगांव भागवत व लाखेफळ या दोन ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत यांनी सर्व मातब्बर विरोधकांचा धुव्वा उडवित थेट जनतेतून सरपंच होण्याचा बहुमान मिळविला. तर या वर्षीच स्थापन झालेल्या लाखेफळ ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंचपदी निवडून येण्याचा मान सविता शरद सोनवणे यांनी पटकावला .त्या केदारेश्‍वरचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांच्या गटाच्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मतमोजणी आज सकाळी तहसील कार्यालयामध्ये संपन्न झाली. एरंडगांव भागवत ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व मनसे रिंगणात होते. त्यात मनसेचे गोकुळ शेषेराव भागवत यांनी सरपंचपदासह सदस्यांच्या चार जागा जिंकून गावावरील वर्चस्व सिध्द केले. तेथे राष्ट्रवादीला तीन तर भाजपला अवघी एक जागा मिळाली. येथे प्रभाग तीन मधील अनुसूचित जाती महिलेचे पद रिक्त आहे.

लाखेफळ ग्रामपंचायतीमध्ये अँड. प्रताप ढाकणे यांचे समर्थक शरद सोनवणे यांच्या पत्नी सविता सोनवणे या सरंपच पदी नऊ मतांनी विजयी झाल्या. त्यांना 261 मते मिळाली. तर भाजपच्या प्रिया हनुमंत बेळगे यांना 252 मते मिळाली. या ठिकाणी सदस्यांच्या सात पैकी सहा जागा सोनवणे यांच्या गटाला मिळाला.

एरंडगांव भागवत ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या उमेदवारांना पडलेली मते अशी गोकुळ शेषेराव भागवत 277 – विजयी , मनोहर मधुकर भागवत – 253, जगन्नाथ नामदेव भागवत – 202, भारत रामराव भागवत – 178 ग्रामपंचायतीच्या अन्य विजयी सदस्यांची नावे अशी अरुण साहेबराव भागवत, भारती अर्जुन भागवत, लताबाई विष्णू भागवत, अर्जुन मुरलीधऱ लोखंडे, संजय विठ्ठल क्षिरसागर, हिराबाई विकास भागवत, मुंकूंद श्रीकिसन लोखंडे, छाया राम भागवत.

लाखेफळला सरपंचपदासाठी मिळालेली मते – सविता शरद सोनवणे – 261 विजयी, प्रिया हनुमंत बेळगे – 252, येथील विजयी ग्रामपंचायत सदस्य असे- शिवाजी नामदेव आव्हाड, रंजना अशोक आवारे, शिवदास गंगाधर आव्हाड, कल्पना महेंद्र भुसांगे, बाळू पुंजा बनकर, संगिता मारुती गर्जे, संगिता नानासाहेब बनसोडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)