नगर : शहर बॅंकेच्या अधिकाऱ्यांची चौकशीत त्रेधा

कर्जप्रकरणासह कागदपत्रांची घेतली माहिती; संचालकांची टप्प्याटप्प्याने चौकशी होणार

मशिनरीचीं माहिती घेणार पोलीस अधिकारी

यातील कर्ज हे रुग्णालयातील मशिनरींसाठी घेतलेले आहे. गुन्ह्यात मशिनरी डिलरांचा देखील समावेश आहे. त्यामुळे रुग्णालयासाठी कोणकोणत्या मशिनरी घेण्यात आल्यात आणि बॅंकेने कोणकोणत्या मशिनरींसाठी कर्ज दिले आहे याची चौकशी पोलीस करणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी बॅंकेकडे मशिनरींनिहाय मंजूर केलेल्या कर्जाची माहिती घेण्यात आली आहे. या कर्जाची कागदपत्रांची देखील बारकाईने तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

नगर – कर्ज घोटाळ्याच्या चौकशीच्या पहिल्याच दिवशी जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर शहर सहकारी बॅंकमधील अधिकारी व कर्मचारी प्रतिनिधी संचालकांची पुरती त्रेधा उडाली. कर्ज प्रकरणाची चौकशीची कागदपत्रांची मागणी जशी होत होती, तसे बॅंकेचे अधिकारी ते पुरवित होते. चौकशी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होऊन सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस अधिकारी जशी कागदपत्रे मागत होती, तसे बॅंकेचे वाहन बॅंकेचे मुख्य कार्यालयत ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत चकरा मारत होते. संचालकांपैकी फक्त एकानेच हजेरी लावली होती. बाकीच्याकडे टप्प्याटप्प्याने चौकशी होईल, असे सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहर बॅंकेचा कर्ज घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे करत आहेत. संचालक मंडळाने सभेत बॅंकेच्या ठेवी सुरक्षित असल्याचा दावा केला होता. बॅंकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असेही सांगितले होते. मंडळांबरोबर असलेल्या सभासदांनी देखील संचालकांच्या कामाकाजाचे कौतुक केले होते.

सभेतील कौतुक पुराण पूर्ण होताच आर्थिक गुन्हे शाखेने बॅंकेच्या संचालक मंडळांना चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसांमुळे बॅंकेच्या काही संचालकांना घामच फुटला आहे. याच दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली. कर्ज मंजूर झाल्यापासूनची सर्व कागदपत्रे उपलब्ध करण्याची सूचना बॅंक अधिकाऱ्यांना पोलिसांनी दिल्या. त्यानुसार बॅंकेचे अधिकारी कर्ज प्रकरणाचे कागदपत्र पोलिसांना पुरवित होते.

कर्ज घोटाळ्यांची कागदपत्रांची माहिती घेण्यात येत आहे. बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडे त्यानुसार आज दिवसभर चौकशी झाली. गुन्ह्यातील संशयित आरोपींची पार्श्‍वभूमी आणि गुन्ह्याशी असलेला संबंधांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. बॅंकेचे संचालक मंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. टप्प्याटप्प्यानुसार त्यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.
– प्रांजल सोनवणे, उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

बॅंकेचे प्रमुख अधिकारी यांच्याकडे प्रांजल सोनवणे केबिनमध्ये सकाळी अकरावाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत कर्ज प्रकरणाचे सर्व मुद्दे समजावून घेतले. दुपारनंतर ही चर्चा जेवणापुरती थांबली होती. त्यानंतर पुन्हा साडेचार वाजल्यानंतर बॅंकेचे अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेत आले होते. त्यांच्याबरोबर काही कागदपत्रे होते. सायंकाळी उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.

गुन्ह्यातील संशयित नावाची पार्श्‍वभूमीचा शोध 

गुन्ह्यातील संशयित आरोपींची यादीच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक प्राजंल सोनवणे घेऊन बसल्या होत्या. संचालक मंडळा व्यक्तिरीक्त गुन्ह्यात असलेल्यांचा इतरांचा या गुन्ह्याशी संबंध कसा याची माहिती त्या घेत होत्या. त्यात मशिनरी पुरविणारे डिलर, सब डिलर यांचा समावेश होता. काहींची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आली. ती देखील देता आली नसल्याचे समजते. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य वाढत असल्यापर्यंत पोलीस आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)