संगमनेरच्या ४० गावांच्या पाणीपुरवठा योजनांना १२८ कोटी 

आमदार थोरात यांचा पाठपुरावा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा निधी

संगमनेर – माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्‍यातील 40 गावांसह 59 वाडी-वस्त्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 128 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. यामुळे वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना नळाद्वारे थेट घरात पाणी मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगमनेर तालुका हा देवकौठे ते बोटा असा विस्तीर्ण आहे. सर्वात कमी पाऊस पेथे पडतो. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामांमुळे सहकार व सरकार यांच्या कामांचा मेळ घालत दुष्काळी तालुका ते विकसित तालुका अशी राज्यात ओळख निर्माण झाली. आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम तालुक्‍याच्या व जिल्ह्याच्या पाणी प्रश्‍नांसाठी पुढाकार घेतला आहे.

दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी कालवे पूर्ण होण्यासाठी सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. तळेगाव भागासाठी वरदान ठरणारी 16 गावची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अनेक अडथळ्यांवर मात करून कार्यान्वित ठेवली आहे. नव्याने तालुक्‍यातील 40 गावांमधून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व पाणी पुरवठा विभागाकडून 44 योजनांसाठी 128 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये देवकौठे, निमगाव भोजापूर, गुंजाळवाडी, चिकणी, सायखिंडी, वेल्हाळे, आंभोरे, वडगाव लांडगा, धांदरफळ बु., जवळे कडलग, निमगांव बु., निमगाव खुर्द, पेमगिरी, सावरचोळ, शिरसगाव धुपे, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, माळेगाव हवेली, तळेगांव दिघे, सुकेवाडी, खांजापूर, मांजुले, हिवरगाव पावसा, ओझर खुर्द, पोखरी बाळेश्‍वर, वरुडी पठार, सावरगाव घुले, महालवाडी, पिंपळगाव माथा, माळेगाव पठार, झरेकाठी, खळी, पानोडी, शिबलापूर, शेडगाव, जोर्वे, गोडसेवाडी, खंदरमाळवाडी, भोजदरी, डोळासणे, सारोळे पठार या गावांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)