नव्या 226 बाधितांची रुग्ण संख्येत भर; 444 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
नगर – करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील रुग्णवाढ थांबण्यास तयार नव्हती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णवाढ उतरतीकडे लागली आहे. आज जिल्ह्यात अवघे नव्याने 226 बाधितांची रुग्ण आढळले असून, 447 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 42 हजार 934 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.39 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत 226 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 218 झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 71, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 88 आणि अँटिजेन चाचणीत 67 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अकोले 09, जामखेड 02, कर्जत 14, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 03, पारनेर 07, पाथर्डी 01, राहता 01, राहुरी 02, संगमनेर 02, शेवगाव 02, श्रीगोंदा 16 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 13, अकोले 01, जामखेड 02, कोपरगाव 05, नगर ग्रा. 08, नेवासा 01, पारनेर 05, पाथर्डी 01, राहता 19, राहुरी 07, संगमनेर 08, शेवगाव 03, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 10 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 67 जण बाधित आढळून आले. मनपा 01, अकोले 06, जामखेड 02, कर्जत 07, कोपरगाव 07, नगर ग्रा. 03, नेवासा 09, पारनेर 05, पाथर्डी 01, राहता 08, राहुरी 07, संगमनेर 03, शेवगाव 02, श्रीगोंदा 04 आणि श्रीरामपूर 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 26, अकोले 11, जामखेड 06, कर्जत 17, कोपरगाव 32, नगर ग्रा. 25, नेवासा 10, पारनेर 37, पाथर्डी 11, राहाता 45, राहुरी 27, संगमनेर 107, शेवगाव 22, श्रीगोंदा 44, श्रीरामपूर 12, कॅंटोन्मेंट बोर्ड 01 मिलिटरी हॉस्पिटल 07 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.