#रक्षाबंधन : महावितरणच्या वायरमन बांधवांसह रक्षाबंधन साजरे

निरंजन सेवा भावी संस्थेच्या वतीने उपक्रम 

नगर – पाऊस,आपत्कालीन ,परिस्थिती अथवा घरातील अचानक लाईट जाण्याने सर्वात प्रथम आठवण येते ती एमएसईबीच्या वायरमनची .अनेक संकटांना तोंड देत ,जीवाची पर्वा न करता कार्यरत असणारे व समाजाकडून कायमच दूर्लक्षित व लोकांच्या रोषाला बळी पडणाऱ्या या बांधवान प्रति कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांचे महत्व महिला वर्गासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे ओळखून निरंजन सेवा भावी संस्थेच्या वतीने वारुळाचा मारुती रोड येथील नालेगाव सबस्टेशन मधील एमएसईबीच्या वायरमन, कर्मचारी बांधवाना राख्या बांधून अनोखा रक्षाबंधन सन साजरा करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्षाबंधन सणाचे महत्व फक्त भाऊ,बहिणी पुरतेच महत्वाचे नसून समाजात चांगले काम करून विविध क्षेत्रात कार्यरत समाज रक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सेवकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने यावर्षी रक्षाबंधन व त्याचा सन्मान करण्यात आला.

दरवर्षी अशा प्रकारे सेवा देणाऱ्यासमवेत रक्षाबंधन साजरा करून सामाजिक सौख्य वाढावे या हेतूने निरंजन संस्थेतर्फे असे उपक्रम राबविले जातील अशी माहिती प्राजक्ता डागा यांनी दिली. उपस्थित प्राजक्ता डागा,पूजा बिहाणी,दीपा चांडक,कृष्णा धूत,पूनम चांडक,सविता झंवर,डॉ.मानसी मनोरकर,रुपाली बोथरा,योगिता कुलकर्णी,अमृता कलंत्री यांनी पारंपारिक पद्धतीने एमएसईबीच्या वायरमन बांधवाना राख्या बांधून रक्षाबंधन सन साजरा केला.

एमएसईबी कर्मचारी सतीश भुजबळ, प्रविण जठार,संदीप जाधव यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. आयुष्यात प्रथमच एखादा सन साजरा करण्याचा आनंद आम्ही सर्व कर्मचार्यांनी एकत्र अनुभवला आहे. वीज क्षेत्रात काम म्हणजे रणभूमीवर काम करण्या इतकी जोखीम आहे. वाढते ग्राहक व कमी कर्मचारी यातून मार्ग काढत काम करताना आमचाही विचार व दखल समाजाने घेतली व कौतुकाची थाप मिळाली. अशा उपक्रमातून मिळणारी उर्जा व प्रोत्साहनमुळे आपुलकी वाढून, एकमेकांन विषयी असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होईल व नागरिकांचे सहकार्य चांगल्या प्रकारे मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला.

मुकुंद धूत यांनी प्रास्ताविक केले.निरंजन सेवा भावी संस्थेचे काम करताना घरातील महिलांनाही प्रेरणा मिळाली व त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. संस्थेने सर्व कर्मचार्यांना सन्मानपत्र व सूरक्षाहेल्मेट भेट देऊन सोबत मिठाईचे वाटप केले. या उपक्रमासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)