रेल्वे गँगमनची आत्महत्या; तिघांचे अटकपूर्व फेटाळले

नगर – रेल्वेचा गॅंगमन बबलूकुमार ठिठर मंडल याच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आज फेटाळले. धमेंद्र ईश्‍वरप्रसाद कुमार (वय 51), जयप्रकाश राणा (वय 40, दोघे रा. रेल्वे कर्मचारी निवासस्थान) व अखिल बशीर शेख (वय 28, रा. देहरे) या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

जिल्हा सरकारी वकील ऍड. सतीश पाटील यांनी जिल्हा न्यायालयासमोर युक्तिवाद करत सरकार पक्षाची बाजू मांडली. जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा युक्तिवाद लक्षात घेत या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
बबलूकुमार ठिठर मंडल हा रेल्वे विभागाच्या वांबोरी रेल्वे स्टेशन येथे गॅंगमन म्हणून काम करतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कर्मचाऱ्याला वरिल वरिष्ठांकडून गेल्या दीड वर्षात एकदाही सुट्टी मिळाली नव्हती. रजेचे अर्ज भरून देखील सुट्टी रद्द करण्यात येत होती. बहिण्याच्या लग्नाला घेतलेली सुट्टी या वरिल वरिष्ठांनी संगनमत करून रद्द केली. या तिघा वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बबलूकुमार याने मोबाईलमधील कॅमेऱ्यात चित्रीकरण करत व्यथा मांडली. हे चित्रीकरण त्याने समाज माध्यमांवर व्हायरल केले होते. या चित्रीकरणात आपण जीवनयात्रा संपवित असल्याचे त्याने म्हटले होते. बबलूकुमार याने 15 ऑगस्टला वांबोरी येथे रेल्वेखाली येत आत्महत्या केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी 16 ऑगस्टला गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)