राहुरी तालुक्‍यात ग्रामपंचायतचा संमिश्र निकाल

राहुरी विद्यापीठ – तालुक्‍यातील मुसळवाडी, खुडसरगाव, टाकळीमियॉ, माहेगाव, चिखलठाण, माळूंजे खुर्द या सहा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह 68 पैकी 60 जागांसाठी काल झालेल्या निवडणूकीची मतमोजणी आज (दि.27) रोजी होवून निकाल जाहिर करण्यात आला. या निवडणुकीत सदस्य पदाच्या 8 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

मतमोजणीसाठी तहसील कार्यालयासमोर उमेदवारासह सहा गावाच्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. निवडूण आलेल्या उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. या निवडणूकीत मुसळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली. यामध्ये अमृत धुमाळ यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा जवळपास साडेबाराशे मतांनी पराभव करून सरपंचपद काबीज केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील माहेगाव ग्रामपंचायतीत निवडणूकीपूर्वी वाद निर्माण होऊन परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. या निवडणूकीत विजयी गटाने गावात स्वस्त धान्य दुकान चालकाचा काळाबाजार उघडकीस आणून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले होते. याची पावती म्हणूनच ग्रामस्थांनी पोलीस पाटील पंकज आढाव यांच्या मातोश्री शारदा किसन आढाव यांना 606 मते देऊन सरपंच पदावर विराजमान केले.

माहेगाव ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी निवडून आलेले उमेदवार रावसाहेब गोलवड, निवृती देठे, वर्षा मुंगसे, वाल्मिक गायकवाड, संध्या कावरे, मंजुषा कवडे, धर्माजी चव्हाण, स्वाती कवडे.

खुडसरगाव ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी बबाबाई माळी (472) या विजयी झाल्या. तर सदस्यपदी रामेश्वर पवार, रेणुका देठे, भिमा बर्डे, कृष्णाबाई पवार, आबासाहेब पवार, सुनिता पवार हे उमेदवार विजयी झाले.

माळूंजे खुर्द ग्रापंचायतमध्ये सरपंचपदी सर्जेराव साळुके तर सदस्यपदी दत्तात्रय लोखंडे, सुभाष पवार, संजिवनी बोरडे, नवनाथ पवार, पल्लवी सोळुंके, वनिता बोरुडे , सुरेश गायकवाड , अंजनी पवार, मनिषा सोळुंके हे उमेदवार विजयी झाले.
चिखलठाण ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी काकडे सुभाष बन्सी, केदार देमा अनाजी, बर्डे रशाबाई शिवाजी, कातोरे खेमा गोंविद, काकडे राजु सदाशिव, केदार लताबाई भिवा, वाघ लक्ष्मण देवराम , केदार सिंधुबाई भिमराज, काकडे प्रितम भानुदास, काळनर किसन विठोबा, भुतांबरे सुनिता नाथु हे उमेदवार विजयी झाले.

मुसळवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपदी अमृत आण्णासाहेब धुमाळ हे 1052 विक्रमी मताने विजयी झाले. तर सदस्य पदासाठी माने श्रीकांत विलास, जोशी किशोर दत्तात्रय, गल्हे रेवती अशोक, भुजाडी रोहन राजेद्र , धुमाळ विक्रात सुधाकर ,तर बिनविरोध झालेले पवार नवनाथ सुदाम, धुमाळ निर्मला सतिष, घोलप सारिका शिवाजी.

टाकळीमिया ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी निकम विश्वनाथ वेनुणाथ 3522 विजयी झाले. तर सदस्यपदी निमसे शिरीष तुकाराम, मोरे अलका सुभाष, जगधने सुभाष दिनकर, शिंदे ज्योती दादासाहेब, निकम मनिषा विश्वनाथ, सगळगिळे नंदा भाउसाहेब, जुंदरे सुभाष भास्कर , शिंदे किरण अरुण , मोरे रविद्र बापुसाहेब , लांडगे शैला बाबासाहेब , मोरे किशोर कोंडाजी , गिरीष सुरेश निमसे , विधाटे आशाबाई संजय हे विजयी झाले तर बिनविरोध निवडुण आलेले उमेदवार करपे मीना सुरेश, जाधव भाग्यश्री दत्तात्रय, शिंदे सुनिल जालिंदर, जाधव माया जालिंदर.

या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार गणेश तळेकर यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक जयंत शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवून निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)