अहिल्यानगर – सेफ्टी टँकचा खड्डा खोदल्याच्या कारणावरून नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात दोन गटांत चाकू, दगड, लाकडी दांडक्याने हाणमारी झाल्याची घटना घडली. मारहाणीत चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शोभा बबन कातोरे (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद नामदेव कातोरे, राजेंद्र नारायण लाळगे, सविता शरद कातोरे, श्रवण शरद कातोरे, विजय नारायण लाळगे, अनिता विजय लाळगे, सुनीता राजेंद्र लाळगे (सर्व रा. कामरगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभा कातोरे यांनी फिर्यादीत म्हटले की, ‘शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी यांना आमच्या घराच्या शेजारी खड्डा का केला असे विचारले असता त्याचा त्यांना राग येऊन त्यांनी मला दगडाने व मुलाला चाकूने मारहाण करून जखमी केले.
सविता शरद कातोरे (वय 43) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण बबन कातोरे, बबन नामदेव कातोरे, रंजित बबन कातोरे, शोभा बबन कातोरे (सर्व रा. कामरगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेंद्र लाळगे यांच्या जागेत सेफ्टी टँकचा खड्डा खोदल्याच्या कारणावरून मला व माझ्या पतीला शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संशयित आरोपी यांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.
मी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकाँर्डिग करत असताना बबन कातोरे याने डोक्यात दगड फेकून मारला. मुलावर खोटा गुन्हा दाखल करून शिक्षण बंद करण्याची धमकी दिली.