प्राध्यापकांचा बेमुदत ठिय्या

कोपरगाव – येथील एस. एस.जी. एम.व के. जे. सोमैया महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महाविद्यालयाच्या गेटवर बेमुदत ठिय्या अंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने पाठींबा दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या वतीने मंगळवार दि.25 सप्टेंबर पासून आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत संपाचा इशारा दिला होता. प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवावी, बेकायदेशिर कपात केलेले 71 दिवसांचे थकीत वेतन मिळावे, घडयाळी तासीका तत्वावरील काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी, 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत असलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, शिक्षक समस्या निवारण यंत्रणा निर्माण कारावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समान काम समान वेतन मिळावे यासह विविध मागण्यासांठी प्राध्यापकांनी संप पुकारून महाविद्यालयाच्या गेटसमोर ठिय्या मांडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाच्या अनेक जाचक अटीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 2011 पासनु महाविद्यालयात नविन प्राध्यापकांची भरती झाली नाही. तासीका तत्वावर 50 टक्के प्राध्यापक नाममात्र मानधनावर काम करतात, त्या प्राध्यापकांचे मानधन सरकार न देता संबधित महाविद्यालयांना द्यावे लागते. त्यासाठी विनाअनुदानित तुकडया वाढवून विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या फीच्या पैशातून तासीका प्राध्यापकांचा पगार देण्याची वेळ महाविद्यालयांवर आली आहे. कमी मानधनावर काम करणारे प्राध्यापक खाजगी कोचिंगकडे वळत आहेत. त्यामुळे खाजगी कोचिंग क्‍लासेसला हे सरकार खतपाणी घालत आहे, असा प्रश्न काही प्राध्यापकांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)