‘पीआरसी’ ला देण्यासाठी 1 कोटी थैलीची जमवाजमव सुरू

 या खंडणीला कर्मचारी संघटनांनी विरोध करावा : भारतीय जनसंसदेचे आवाहन

अकोले – ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज (पीआरसी)कमिटी नगर जिल्ह्याला भेट देणार आहे. या “कमिटी’ला 1 कोटी रुपये रकमेची “अनधिकृत थैली’ द्यावी लागणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी सध्या जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सक्‍तीने मोठ्या रक्‍कमा जमा करण्यात येत आहे. त्याला कर्मचारी संघटनेने विरोध करावा असे आवाहन भारतीय जनसंसदेने केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंचायत राज कमिटी येत्या 4 ते 6 आक्‍टोंबर दरम्यान नगर जिल्ह्यात येत आहे. या कमिटीला खुश करण्यासाठी त्यांना मोठी रक्कम लाच म्हणून द्यायची आहे. या नावाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मोठ्या रकमा गोळा केल्या जात आहेत. एक कोटींपेक्षा जास्त रक्कम देण्याचे “टार्गेट’ निर्धारित असून यासाठी सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना सक्ती केली जात आहे. भारतीय जनसंसदेकडे अनेक कर्मचारी या शोषणाबाबत आपली व्यथा मांडत आहेत. जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य यासह सर्वच विभागाच्या कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन या आर्थिक शोषणाला विरोध करावा, असे आवाहन भारतीय जन संसदेचे हेरंब कुलकर्णी, राज्य निमंत्रक अशोक सब्बन, जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, कारभारी गवळी, सरचिटणीस कैलास पटारे यांनी केले आहे.

अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना आपले मोबाईल बंद करायला लावण्यात आले व मग हे आदेश दिले आहेत. जे कर्मचारी पैसे देत नाहीत. त्यांना कोड भाषेत मेसेज पाठवले जात आहेत. आपला योगदान अहवाल लवकरात लवकर जमा करावा अशी मेसेजची भाषा आहे. ग्रामसेवकांना प्रत्येकी 6 हजार रुपये मागितली आहे,असे कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात केला आहे.

आपण व भारतीय जनसंसद सदस्य पीआरसी कमिटीला पत्र लिहीत असून नगरला आल्यावर प्रत्यक्ष निवेदन पण देणार आहे. तुमच्या नावावर हे पैसे गोळा केले जात आहेत. हे स्पष्ट कमिटीला सांगणार आहे. लाचलुचपत विभागाने ही याची दखल घ्यावी, अशी मागणी करणार आहे. असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसण्याच्या काळात ही कमिटी येते आहे. या उपोषण काळात होणारा हा उघडउघड गैरव्यवहार कार्यकर्ते सहन करणार नाहीत. कर्मचाऱ्यांनी निर्भयपणे असे पैसे मागण्यांचे पुरावे गोळा करून भारतीय जनसंसदेला सादर करावेत, असे आवाहन राज्य निमंत्रक अशोक सब्बन यांनी केले आहे.

निधी संकलित करण्याचे ठरले दर

पंचायत राज कमिटी देण्यासाठी सर्व विभागांना निधी संकलित करण्याचे सांगण्यात आले असून त्यासाठी दर ठरवून दिली आहे. शिक्षक एका केंद्रप्रमुख 25 हजार, पशुधन पर्यवेक्षक 10 हजार, पशुधन विकास अधिकारी 15 हजार, शाखा अभियंता 25 हजार, महिला बालकल्याण पर्यवेक्षक 10 हजार, कारकून 5 हजार, आरोग्य कर्मचारी 5 हजार, विस्तार अधिकारी सर्व 10 हजार (प्रत्येकी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)