‘बिल्डर’ कडे खंडणी मागणाऱ्याला अटक

50 लाखांच्या खंडणीची मागणी : संशयित अारोपींची संख्या वाढण्याची शक्यता

नगर- शहरातील बांधकाम व्यवसायिकाला 27 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. कैलास बापूराव शिंदे (रा. ठाकूर गल्ली, नगर) असे या खंडणीखोराचे नाव आहे. बांधकाम व्यवसायिक कल्पेश अमरसिंग परदेशी (रा. भराडगल्ली, चितळेरोड, नगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कल्पेश परदेशी यांच्या विरोधात खंडणीखोर कैलास शिंदे याने महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय दोनकडे 30 मे 2017 ला हॉटेलच्या बांधकामाविषयी तक्रार केली होती. शिंदे याने ही तक्रार यानंतर 24 नोव्हेंबर 2017 ला जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रारी अर्ज निकाली काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या नगर कार्यालयाकडे वर्ग केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा अर्ज कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत निकाली काढला.

कैलास शिंदे याने हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यासाठी परदेशी यांना निखील ढोणे (रा. लोणार गल्ली) यांच्यामार्फत निरोप पाठविला. यानुसार परदेशी आणि त्यांचा भाऊ प्रदीप हे निखील ढोणे यांच्या बोलवण्यावरून कल्याण रोडवरील एका हॉटेलजवळ भेटले. कैलास शिंदे हा तिथे चारचाकी गाडीमध्ये आला होता. तक्रार मागे घेण्यासाठी शिंदे याने परदेशी यांच्याकडे त्यावेळी 50 लाख रुपये मागितले. परदेशी यांनी 10 लाख रुपये देतो, असे त्यावेळी सांगितले होते. येथे प्रकरण मिटले नाही.

काही दिवसानंतर कैलास शिंदे याने सुनील दळवी व बाबासाहेब भगत (रा. बुऱ्हाणनगर) या दोघांना परदेशींकडे मध्यस्थीसाठी पाठविले. यावर परदेशी यांनी या दोघांना कैलास शिंदे याला समक्ष भेटण्यास बोलविले. यानुसार 22 सप्टेंबरला सुनील दळवी यांच्या घरी भेटण्याचे ठरले. यानंतर दुसऱ्या दिवशी 23 सप्टेंबरला परदेशी हे त्यांचा भाऊ प्रदीप, मध्यस्थी बाबासाहेब भगत यांच्या मदतीने बुऱ्हाणनगर येथे सुनील दळवीच्या घरी दुपारी अडीच वाजता गेले. कैलास शिंदे व त्याचा मित्र पोपट पाराजी राऊत हे दोघे तिथे आले होते. कैलास शिंदे याने तिथे तक्रार मागे घेण्यासाठी परदेशी यांच्याकडे 31 लाख रुपयांची मागणी केली.

यावर परदेशी हे 25 लाख रुपये द्यायला तयार झाले. शिंदे मात्र एवढे पैसे द्यायला तयार नव्हते. यावर कैलास शिंदे याने मिळणाऱ्या पैशातील वाटेकऱ्यांना विचारून सांगतो, असे बोलून तेथून निघून गेला. पाच दिवसानंतर 27 सप्टेंबरला तडजोडीनंतर प्रकरण 27 लाख रुपयांवर मिटविण्याचे ठरले. खंडणीखोर कैलास शिंदे यानुसार टोकनाची एक लाख रुपयांची रक्कम घेण्यासाठई मार्केटयार्ड येथील बालाजी ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये आला होता. दरम्यानच्या काळात परदेशी यांनी शहर पोलिसांनी संपर्क साधून खंडणीखोराची माहिती दिली होती. त्यानुसार परदेशी यांच्याकडून स्वीकारत असतानाच खंडणीखोर शिंदे यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)