थोरात आणि जगताप पेन्शन दिंडीत सहभागी होणार

जुनी पेन्शन हक्क संघटनेचे लोकप्रतिनिधींना भेटून दबाव निर्मिती

नगर – जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे मुंबई येथे दोन ऑक्‍टोबरला होणाऱ्या पेन्शन दिंडी आणि सामहूक उपोषणात माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार संग्राम जगताप सहभाग होणार आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनेने पेन्शनसाठी आंदोलन तीव्र केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन निवेदन देऊन दबावगट तयार करत आहे. याला प्रतिसाद देखील मिळत आहे. संघटनेच्या संगमनेर शाखेने बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले. पेन्शन मिळत नसलेल्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची व्यथा शिवाजीराव आव्हाड यांनी यावेळी मांडली. आपल्या हक्कासाठी पेन्शन दिंडीत सहभागी होणार असल्याचे आवाहन थोरात यांनी आश्‍वासन दिले. राज्यनेते योगेश थोरात, सरचिटणीस नीलेश हारदे, किरण कटके, महिला प्रतिनिधी जयश्री कदम आदी उपस्थित होते.

दरम्यान, संघटनेच्या नगर पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांचे लक्ष वेधत निवेदन दिले. आमदार जगताप यांनी देखील या पेन्शन दिंडीत सहभागी होणार असल्याचे आश्‍वासन संघटनेचे जिल्हाप्रसिद्ध प्रमुख शैलेश खणकर यांनी माहिती दिली. जिल्हा संघटक संदीप भालेराव, नगर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र कदम, अरविंद थोरात, भास्करराव खोडदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)