पाथर्डी जुगार अड्ड्यावर छापा

सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त : ९ जणांना पोलिसांनी केली अटक 

पाथर्डी – पाथर्डी तालुक्‍यातील सोमठाणे येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.शुक्रवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेने तालुक्‍यातील जुगार चालकांसह अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाथर्डी- शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांना पाथर्डी तालुक्‍यातील सोमठाणे येथे शेतात पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. जवळे यांच्या आदेशानुसार पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याचे नियोजन केले.शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोमठाणे येथे पथक पाठवून शेतात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून रोख रकमेसह सुमारे सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुभाष खिळे यांच्या फिर्यादीवरून गणेश लक्ष्मण भडके, विठ्ठल नागनाथ दराडे, कल्याण शिवराम जाधव, दिलीप दामोदर खर्चन, ज्ञानेश्वर आप्पासाहेब नलावडे, मनोरखॉ पठाण, विष्णू एकनाथ कासुळे, रामदास शंकर काकडे, मच्छिंद्र लक्ष्मण सुपेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोहिमेत पोलीस हेडकॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, भगवान सानप, ज्ञानेश्वरी इलग, वसंत फुलमाळी, गणेश राठोड आदींनी सहभाग घेतला पुढील तपास पीएसआय परमेश्वर जावळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)