पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

नगर – पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर, माणिकदौंडी गण या भागात फारच कमी पाऊस झालेला आहे. पावसाअभावी मोहटा ते जोगेवाडी येथील सर्वच पिके वाया गेलेली आहेत. ऊसावर हुमनीचा प्रार्दुभाव झालेला आहे. कपासी, बाजरी,मूग, सोयाबीन, कांदा ही पिके संपूर्णपणे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. पावसाअभावी शेतातील पिकांचे नुकसान होत असून शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे प्राथर्डी तालुका दुष्काग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि तालुक्यातील शेतकरी यांनी  तालुक्याचे तहसिलदार यांना दिले आहे.

तसेच या मागणीसोबत शेतकऱ्यांच्या  शेतातील पिंकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांस 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी, शेतकरी, शेतमजूर आणि जनावरे यांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकरी आणि शेतमजूर यांना दुष्काळी कामे द्यावीत अशा प्रमुख मागण्या या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत. तसेच मुळेचे आणि पैठण तलावाचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी मिळावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबरोबरच या प्रमुख मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, पाथर्डी व शेवगाव यांच्या वतीने 3 आॅक्टोबर रोजी करोडी येथे रास्ता रोको आणि धरणे आदोंलन करण्यात येईल असे देखील  निवदेनात म्हटले आहे.

या निवेदनावर पाथर्डी संघटनेचे डाॅ. विजयकुमार पालवे, शेवगाव संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय कुंदे, पाथर्डी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष रामकिसन  शिरसाठ, शेवगाव स्वाभिमानी पक्ष अध्यक्ष संतोष गायकवाड, अहमदनगर स्वाभिमानी संघटनेचा युवा कार्याध्यक्ष विकास नागरगोजे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)