शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्ली दरबारी मांडली व्यथा
नेवासा – अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाफेड आणि एनसीसीएफ अंतर्गत कांदा खरेदी करतांना येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिल्ली दरबारी मांडण्याचे काम शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची गुरुवार (दि.२०) रोजी दिल्लीत भेट घेवून नगर जिल्हा यांनी नाशिक जिल्ह्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भावात दुजाभाव होत असल्याची गंभीर तक्रार करत नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाशिक प्रमाणे भाव देण्याची मागणी यावेळी लोखंडे यांनी केंद्रिय मंञी जोशी यांच्याकडे केली व निवेदन दिले.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यानुसार भाव मिळावा तसेच सदर कांद्याचा दर हा दैनंदिन मार्केटनुसार बदलत असतांना त्याप्रमाणे भाव वाढ मिळण्याच्या मागणी माजी खासदार लोखंडे यांनी केली यावेळी सकारात्मकता दर्शवत लवकरच अहमदनगर जिल्ह्याकरीता नाशिक जिल्ह्याचा दर दिला जाईल तसेच दररोज भावात बदल होत असल्याने नगर जिल्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाढ भाव मिळण्याची ग्वाही यावेळी केंद्रिय मंञी जोशी यांनी दिले.
या चर्चेवेळी माजी मंत्री महोदय प्रल्हाद जोशी,निधी खरे,सचिव आणि एन.सी.सी.एफ एम.डी.श्रीमती चंद्रा उपस्थित होत्या माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा भाववाढीच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्याच्या कांदा उत्पादकांप्रमाणे नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी भाववाढी संदर्भात थेट दिल्ली दरबारी जावून भेट घेवून शेतकऱ्यांची व्यथा सरकार समोर मांडल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात असून माजी खासदार लोखंडे यांच्या पाठपुराव्याचे शेतकऱ्यांतून मोठे कौतुक केले जात आहे.