वृत्तपत्र विक्रेत्यांची निदर्शने

नगर - विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करताना वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी.

स्वतंत्र सल्लागार मंडळाची मागणी : विखे पाटील यांचा आंदोलनात सहभाग

नगर – असंघटीक कामगार म्हणून नोंदणी व्हावी व कल्याणकारी मंडळाची अंमलबाजवणी करावी आदी मागण्यांसाठी आज जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांसदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधू,असे आश्‍वासन विखे पाटील यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृत्तपत्र विक्रेते हे असंघटीत कामगार आहेत. वाढती महागाई पाहता त्यांचे दैनंदिन गरजा भागविणे जिकरीचे झाले आहे. या असंघटीत कामगारांची नोंदणी होऊन त्याला सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी राज्यभरातील असंघटीत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी झाली पाहिजे. कल्याणकारी मंडळात या विक्रेत्यांना स्थान देऊन त्यासाठी भरीव तरतुदीची मागणी देखील निदर्शन करताना आंदोलकांनी केली. महाराष्ट्र राज्य असंघटीत सुरक्षा वृत्तपक्ष विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ गठीत करावे, गटई कामगारांप्रमाणे मोक्‍याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, त्याचा हा व्यवसाय अतिक्रमण समजू नये, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा असावा आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिले.

वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष गणेश गांधी, शिवाजी काळदाते, सुनील गीते, प्रमोद पंतम, संजय गोरे, सुनील जोशी, अरुण भडांगे, संतोष कर्डिले, दत्तात्रय मारा, अमित पठारे, सचिन अरणकल्ले, प्रमोद पाठ, पुरूषोत्तम बेती, प्रमिला अनिल खर्पे, धनंजय जव्हेरी, बाळासाहेब गदादे, सुरेश फुलसौंदर, विशाल शेळके, धनंजय पुरोहित, अल्ताफ शेख, तौसीफ शेख, यांच्यासह शहराती बहुतांशी वृत्तपत्र विक्रेत आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)