गोपाळपूर ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला

गोपाळपूर – नेवासा तालुक्‍यातील गोपाळपूर ग्रामपंचायतीसाठी येत्या 24 फेब्रुवारी ला मतदान होत असून प्रथमच जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने दोन्ही गटांनी प्रयत्न पणाला लावले आहेत. सरपंच व सात सदस्य पदासाठी ही निवडणूक होत असून दोन्ही गटाकडून प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे.

गोपाळपूर ग्रामपंचायतसाठी दोन गटामध्ये सरळसरळ लढत होत असून गाव विकासावर दोन्ही गटांकडून आश्वासने दिली जात आहेत. आपला जाहीरनामा मतदारांपर्यत घेऊन जाताना गाव पुढाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप होत असून यातून गावातील लोकांची चांगलीच करमणूक होत आहे. दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

उमेदवारांकडून आश्‍वासनांची खैरात केली जात आहे. कार्यकर्ते मतांची जुळणी करण्यात व्यस्त आहेत. गोपाळपूरला 2005 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार मिळाला असून गावामध्ये अनेक विकास कामे झाले आहे. परंतु गावामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा सांडपाण्याचा आहे. गळनिंब प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असून दोन्ही गटाकडून पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)