अण्णा हजारेंच्या आंदोलनास पाठींब्यासाठी नगरमध्ये रॅली

नगर – ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे सुरु केलेल्या आमरण उपोषण आंदोलनास पाठींबा देण्यासाठी नगरमधील थोर महापुरुष विचार मंच तर्फे नगर शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅलीचा समारोप करून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

थोर महापुरुष विचार मंचचे अध्यक्ष अनिल हजारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या जनजागृती रॅलीत नारायण साठे, कारभारी सुंबे, मनीषा लहारे, वैभव शिंदे, कैलास शिंदे, मनोज दळवी, शरद कासार, अविनाश कदम, नंदू कोहक, योगेश साळुंके, विशाल दळवी, नवनाथ शेलार, सचिन कुलकर्णी, हनुमंत दळवी, गणेश चेमटे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

शहरात ठिकठिकाणी या जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालावर या जनजागृती रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हंटले आहे की, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी लोकपाल व लोकायुक्त नेमणूक करणे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्यांसाठी राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाची तातडीने दखल घेत आण्णांच्या मागण्या मान्य कराव्यात व त्यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी करण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here