वाढीव महागाई भत्त्याचा निर्णय राज्यशासनाने तात्काळ घ्यावा

शिक्षक नेते सुनील गाडगे : मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

नगर – केंद्र सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुलै 2018 पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता जाहीर झाला आहे. त्याच धर्तीवर सुमारे 19 लाख राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि साडेसहा लाख पेन्शनधारकांना जानेवारी 2018 आणि सध्याच्या जुलै 2018 पासूनचा वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे नेते सुनील गाडगे यांनी मुख्यामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी,महिला राज्य प्रतिनिधी शकुंतला वाळुंज, जया गागरे, छाया लष्करे, जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, महानगर महिला अध्यक्षा माधवी भालेराव, शैला कुटीनो, बेबीनंदा लांडे, जयश्री ठुबे, मंजुषा गाडेकर, माधुरी सोनार, नवनाथ घोरपडे, काशिनाथ मते आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्यामंत्र्यांबरोबर चर्चा केली.

त्या बैठकीत केंद्राप्रमाणे महागाई भत्त्याची वाढ विनाविलंब देण्यात येईल, असे आश्‍वासित करण्यात आले होते. त्यास राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आणि अर्थ व नियोजन विभागाच्या अपर मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत दुजोरा देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्यात केंद्राप्रमाणेच जानेवारी 2018 व जुलै 2018च्या वाढीव महागाई भत्त्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)