रिकाम्या बाटल्यांद्वारे माळरानावरील झाडांना पाणी

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम  : जगंलात बनविले प्लास्टिक टाकून छोटे तळे

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील नान्नज दुमाला येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने झाडे जगविण्यासाठी रिकाम्या पाणी बाटलीच्या मदतीने थेट झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, बाष्पीभवनही रोखण्यास मदत होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नान्नज दुमाला परिसरात सुमारे 8 हेक्‍टर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभाग पसरले आहे. या ठिकाणी 9 हजार विविध प्रकारची झाडे आहेत. त्यात सिताफळे, लिंब, कांचन आदींचा समावेश आहे. ही झाडे जगविण्याची जबाबदारी येथील सामाजिक वनीकरण विभागाची आहे.

सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्याने सर्व झाडे जगविणे कठीण झाले होते. मात्र, आता झाडांना बाटलीद्वारे पाणी देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी के. यु. बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक डी.व्ही. शिंदे, वनमजूर व्ही. जी. सोनावणे यांच्या मदतीने सर्व झाडाला पाणी देण्याची नवीन पद्धत सुरू केली.

जंगलात प्लास्टिक कागद टाकून छोटे तळे बनवले. त्यात टॅंकरद्वारे पाणी टाकून मजुरांच्या मदतीने रिकामी पाण्याची बाटली उलटी करून झाडाच्या मुळापर्यंत लावण्यात आली. यामुळे पाणी थेट झाडाच्या मुळाशी जाणार असून त्याचे बाष्पीभवन होणार नाही. या बाटलीमध्ये खडी भरली तसेच त्यात आठवड्याला पाणी टाकले जाते. परिणामी पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.

“यावर्षी तालुक्‍यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 42 हजार झाडे लावण्यात आली आहे. दुष्काळी परस्थिती निर्माण झाल्याने रोप जगविण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. हा उपक्रम सर्वच क्षेत्रात राबविला जात आहे. यामुळे कोमजून जाणाऱ्या रोपांना पालवी फुटली आहे.                                                                                –  के.  यु. बिरारीस, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग संगमनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)