वडनेर हवेली ग्रामपंचायतीवर नवक्रांती पॅनलचे वर्चस्व 

सुपा – पारनेर तालुक्‍यातील वडनेर हवेली ग्रामपंचायत निवडणूकीत नवक्रांती पॅनेलने सत्तेवर असणाऱ्या परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवला. सरपंच पदासाह 5 जागेवर विजय मिळवला. सरपंच पदासह 7 सदस्यासाठी बुधवारी मतदान झाले होते. मतमोजणी पारनेर तहसील कार्यालयात झाली. सकाळी 11:30 वाजता निकाल जाहीर झाला. मतदारांनी नवक्रांती पॅनेलवर विश्वास दाखवला. नवक्रांतीच्या सरपंचासह 7 पैकी 5 जागेवरील उमेदवारांनी विजय मिळवत सत्ता मिळवली.

विरोधी गटाला फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी व नीलेश लंके गटातील कार्यकर्ते एकत्र येत नवक्रांती पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्यामुळे सत्तेवर असणाऱ्या शिवसेना प्रणीत राजीव सोनुळे गटाचा दारुण पराभव झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निवडणूकीत विजयी व पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे-

सरपंचपद- राष्ट्रवादी व लंके समर्थक गटाचे लहू रामदास भालेकर (614) विजयी विरुद्ध शिवसेनेचे भाऊसाहेब गंगाराम सोनुळे(365)पराभूत .

सदस्य- वार्ड क्रमांक एक मधून (सर्वसाधारण स्त्री) जयश्री बाळू वाळुंज विजयी(114)विरुद्ध पराभूत पुष्पाताई मोहन भालेकर (59)(नागरिकाचा मागास प्रवर्ग) नंदू विठ्ठल भालेकर, विजयी(117)विरुद्ध पराभूत (57) प्रकाश विष्णू वाळुंज वार्ड क्रमांक दोन मधून (सर्वसाधारण स्री राखीव) सोनाली विकास शिंदे विजयी(135)विरुद्ध पराभूत सुरेखा रोहिदास कर्डिले(119), (सर्व साधारण व्यक्ती) तात्याभाऊ दिगंबर भालेकर विजयी(131)विरुद्ध पराभूत अंकुश येशवंत बढे(121), वार्ड क्रमांक तीन मधून (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री राखीव)स्वप्नाली सतिश भालेकर विजयी(316)विरुद्ध पराभूत शीतल भाऊसाहेब कुटे(233), (सर्वसाधरण महिला) अलका सुधाकर हारदे विजयी(204)विरुद्ध पराभूत वैशाली गणेश हारदे(148), (अनुसूचित जाती) संतोष तुकाराम केदारे विजयी(333)विरुद्ध पराभूत कुणाल जगदीश केदारे (222) सर्व जागेसाठी दुरंगी लढती झाल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)