उत्सवात यंदा नियमांची कडक अंमलबजावणी

नगर – यंदा गणेशोत्सव आणि मोहरम हे सण एकत्रितपणे येत असल्याने शराच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी पोलीस आणि प्रशासनाने पावले उचलण्यास सुरवात केली असून यासंदर्भात पोलीस, प्रशासन , लोकप्रतिनिधी ,गणेशोत्सव मंडळे आणि यंग पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकिचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात बुधवारी दि.29 रोजी आयोजित केली आहे.

गणेशोत्सव आणि मोहरम उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रसंग घडु नयेत यासाठीच्या सुचना या बैठकित दिल्या जाणार आहेत.या कालावधीत उभारले जाणारे मंडप ध्वनीक्षेपक व अन्य बाबींसंदर्भात न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंडप घालतांना मोठे चारचाकि वाहन अग्नीशमन दलाचा बंब , रुग्ण वाहिका यांना कोणताही अडथळा निर्माण होवू नये याबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे.त्याचबरोबर मनपाच्या निवडणुकाही येवू घातल्याने स्थानिक नेतेमंडळीही विशेषत्वाने कार्यरत होणार असल्याने या वर्षीच्या उत्सवांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

आगामी दोन महिन्याच्या कालावधीत गणेशोत्सव , मोहरम आणि नवरात्रोत्सव आदी महत्वाचे उत्सव असून याकाळात विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रमांचे आयोजन केले जाते.याबाबतही सुचना याबैठकित दिल्या जाणार आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ, यंगपार्ट्यांना परवानगी देतांना न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती दिली जाते मात्र , त्याचे उल्लघन करणाऱ्या मंडळांवर कोणतीही कारवाई होतनसल्याचा सार्वत्रिक समज झाला आहे मात्र यावर्षापासून गेल्यावर्षी उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन केलेल्या मंडळांना यावर्षी परवानगी न देण्याचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत प्रशासन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)