प्रेस फोटोग्राफरवर खूनी हल्ला

जामखेड – प्रेस फोटोग्राफर, स्थानिक व जिल्हास्तरीय वृत्तवाहिन्याचे कॅमेरामन अशोक वीर यांच्यावर शहरातील गजबजलेल्या खर्डा चौकात तीन जणांनी जीवघेणा हल्ला केला. लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण करून कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. जखमी वीर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अशोक वीर हे साई लॅबवर काम देऊन मोटारसायकलवरून दुकानात जाण्यासाठी खर्डा चौकातून जात असताना तीघांनी वीर यांची मोटारसायकल अडवून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. वीर यांच्या शर्टचा खिसा फाडून त्यांना खाली पाडून, त्यांच्याकडील साडेतीन हजार रूपये घेऊन लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. यावेळी गजबजलेल्या खर्डा चौकातून त्यांना सोडण्यासाठी कोणीच आले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याचवेळी मारहाण करणाऱ्या एकाने कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. एका महिला हा प्रकार पाहून जखमी वीर यांच्या मदतीला आली. त्या महिलेने वीर यांच्यावर उगारलेला कोयता धरून फेकून दिला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. जखमी वीर यांनी त्वरित पोलीस स्टेशनला धाव घेतली.

जामखेड पोलिसांनी जखमी वीर यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. सदर घटनेचा तालुक्‍यातील सर्व पत्रकारांनी निषेध करून अरोपींना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आरोपींना त्वरित अटक न केल्यास पत्रकार संघटनेने उपोषणाचा इशारा दिला आहे. या घटनेचा संभाजी ब्रिगेड, जिव्हाळा फाऊंडेशन, महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेने निषेध करून पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)