दुधाच्या टॅंकर व बस अपघातात तीन ठार

नेवासे (दि.23) – नगर- औरंगाबाद महामार्गावरील नेवासे तालुक्‍यातील कांगोणी फाट्याजवळ पहाटे दुधाच्या टॅंकरला भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रव्हल्सच्या बसची पाठीमागून जोराची धडक बसून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील सात जण गंभीर जखमी झाले असून 21 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. संजय रामकृष्ण सावळे (वय-40 जि.बुलढाणा), आकाश सुरेश यांगड (वय-27, रा. खंडाळा ता. चिखली, जिल्हा- बुलढाणा), कल्पेश गुलाबराव व्यवहारे (वय-22, रा. सारोखपीर ता. मौताळा, जि. बुलढाणा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

रॉयल चिंतामणी ट्रव्हल्स कंपनीची बस (क्रमांक.एम.एच 23 डब्लू 4086) पहाटेच्या सुमारास पुणेकडे चालली होती. पहाटेच्या सुमारास पुढे चाललेल्या दुधाच्या टॅंकरला (क्रमांक एम.एच 12 एचडी 5402) ट्रव्हल्सने भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात बुलढाणा येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ललीत पांडुळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींना नगर येथील जिल्हा रुग्णालयातमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमीमध्ये- ज्योती हिवराळे (वय-37 बुलढाणा), ज्ञानेश निकाळजे (वय-38बुलढाणा), सुरज गलांडे (बुलढाणा), प्रेम निकाळजे (बुलढाणा), महेश बुधीवंत (वाशीम), छाया सुरवाळे (बुलढाणा), भरत सावळे (बुलढाणा), करण सावळे (बुलढाणा), राजू यांगड (बुलढाणा), बेबी यांगड (बुलढाणा), पावतीबाई गवते (बुलढाणा), गोपाळा चंगड (बुलढाणा), विघेना झाडे (बुलढाणा), गोपाल यांगड (बुलढाणा), पदमाकर इंगळे (बुलढाणा), विजय गव्हाणे (अमरावती), अनिता गव्हाणे (अमरावती), संतोष तुकाराम पुरकर (ता. मुक्ताईनगर जि.जळगाव), स्वाती गणेश पाखरे ( पुणे), स्वाती महेश पठारे (पुणे), गजानन दत्तात्रय हिंगे, उषा गजानन हिंगे, अनिल परशुराम मोंडवे, रेखा अनिल मोंडवे यांचा समावेश आहे. चितांमणी ट्रॅव्हलचा चालक शांताराम तुकाराम खंडेराय (मुक्ताईनगर जि.जळगाव ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.