शासनाचा तोंडी आदेश, गाव तिथे छावणी

जिल्हाधिकारी द्विवेदी यांची माहिती : पालकमंत्री यांची शिफारस लागणार

नगर  – गाव तिथे छावणी सुरू करण्यास अध्यादेशातील तरतुदींनुसार शासनाने तोंडी परवानी दिली आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू आहे. परंतु लेखी परवानी सोमवारपर्यंत येण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार अधिक वेगाने कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे छावणी सुरू करताना शासनाच्या अध्यादेशानुसार कार्यवाही होणार आहे. पालकमंत्री यांच्या शिफारश त्यासाठी आवश्‍यक आहे. इतर देखील अटी आहेत. परंतु त्याची प्रस्तावानुसार अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

द्विवेदी म्हणाले, जिल्ह्यात पाथर्डीतील राहत छावणी सोडून 25 चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कर्जत व जामखेड येथे प्रत्येकी तीन, पाथर्डी येथे 12 व पारनेर येथे पाच छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता आणि छावण्यांना परवानी देण्यासाठी सुट्टीच्या काळात देखील जिल्हाधिकारी कार्यालय सुरू राहणार आहे.’ पूर्वी एका महसूल मंडळात एका पेक्षाजास्त चारा छावण्यांना परवानी देण्यात येत होती. आता मात्र गावनिहाय चारा छावण्या सुरू करण्याचा शासनाने तोंडी आदेश दिला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. परंतु शासनाचे यासंदर्भात सोमवारपर्यंत लेखी आदेश येण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास वेगाने कार्यवाही होणार आहे. छावण्यांना मंजुरी देताना शासनाच्या अध्यादेशानुसारच अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींच्या शिफारशींवरून गोंधळ आहे. याबाबत द्विवेदी म्हणाले, “पालकमंत्री यांची शिफारस छावणीसाठी आवश्‍यक आहे. तसे अध्यादेशात म्हटले आहे. त्यानुसार कार्यवाही होत आहे. नगर जिल्ह्यातील गेल्या काही वर्षांचा छावण्यांमधील गोंधळ पाहता, अध्यादेशातील नियमानुसारच छावण्यांना परवानगी देण्यात येणार आहे.’ त्याचबरोबर काही सामाजिक संस्थांना अध्यादेश निघण्यापूर्वीच छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्या निकषात असल्यास त्यांनाही शासनाच्या अध्यादेशानुसार मान्यता देण्यात येईल, असेही द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

मंजुरी देण्यात आलेल्या 23 छावण्या

पारनेर ः भाळवणी, बुगेवाडी, कर्जुले हर्या, खडकवाडी, रुईछत्रपती. पाथर्डी ः करंजी, अकोला, आल्हाणवाडी, भोसे, ढवळेवाडी, वसुजळगाव, मिरी, चिचोंडी, निपाणी जळगाव, केळवंडी, मोहोज खुर्द, शिरसाठवाडी. जामखेड ः जामखेड, अरणगाव व जवळा. कर्जत ः कोभळी येथे दोन, मिरजगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.