‘बीएसएनएल’ आजपासून तीन दिवस शुकशुकाट

देशव्यापी संप : केंद्राच्या धोरणाचा आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

नगर  – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत, विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया युनियन्स ऍण्ड असोसिशन ऑफ बीएसएनएलने तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपाला पाठिंबा देत नगरमधील बीएसएनएल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी बीएसएनएल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत संप पुकारला. केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार घोणबाजी करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी जम्मू काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्‌यातील शहीद जवानांना बीएसएनएलतर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली. नगर जिल्ह्यातील सुमारे एक हजार पेक्षा जास्त कर्मचारी या संपात उतरले आहेत.

जिल्ह्यातील या संपाचे नेतृत्व बीएसएनएल ईयू संघटनेचे कॉ. आप्पासाहेब गागरे, विठ्ठल औटी, लालाजी शेख, विजय शिपणकर, रमेश शिंदे, एनएफटीइचे बजरंग घटे, त्रिंबक दुधाडे, स्नेहाचे कॉ.विजय पिंपरकर, एस.के. घुगे, बीएसएनएल ईएचे शिवाजी तांबे, रवींद्र शिंदे आदी करीत आहे. बीएसएनएलला फोरजी स्पेक्‍ट्रम द्या, 15 टक्के वाढीसह वेतनाची पुनर्रचना अमलात आणा, बीएसएनएलच्या टॉवर्सचे आऊट सोर्सिंग बंद करा, बीएसएनएल च्या जमिनीचे व्यवस्थापन धोरण ठरवा, बीएसएनएलला बॅंकाकडून कर्ज घेण्यासाठी लेटर ऑफ कम्फर्ट द्या, सर्व मालमत्ता बीएसएनएलच्या नावावर करा आदि मागण्यांसाठी हे तीन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)