झेडपीचे 32 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

शहिद जवानांच्या कुटुंबाना आर्थिक मदतीसह अनेक नवीन योजना

नगर – मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना शेती उपयोगी साहित्य, मागासवर्गीय बेरोजगारांना बॅटरी संचलित रिक्षा, शहिद जवानांच्या कुटुंबाना आर्थिक मदत व गाव रस्ते ठिकाणी बसण्यासाठी बाकडे या नवीन योजनांचा समावेश असलेले जिल्हा परिषदेचे सन 2019-20 या आर्थिक वर्षाचे 24 लाख 63 हजार 156 रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक आज अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांनी सादर केले.

पंचायत समितीसह 49 कोटी 19 लाख 77 हजार 523 रुपयांचे सन 2019-20 चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून त्यात जिल्हा परिषदेचे 31 कोटी 6 लाख 85 हजार 417 रुपये समावेश आहे. या मुळ अंदाजपत्रकात आरंभिची शिल्लक 28 लाख 40 हजार 473 रुपये असून जिल्हा परिषदेचे महसूल जमा 44 कोटी 8 लाख 83 हजार 950 तर भांडवली जमा 4 कोटी 82 लाख 53 हजार 100 रुपये आहे.

सन 2019-20 मध्ये अपेक्षित जमा होणार निधीमध्ये स्थानिक उपकर दोन कोटी 50 लाख, वाढीव उपकर एक कोटी 35 लाख, मुद्रांक शुल्क 16 कोटी, उपकर सापेक्ष अनुदान पाच कोटी 80 लाख, अभिकरण शुल्क एक कोटी, प्रोत्साहन अनुदान एक कोटी, गुंतवणुकीवरील व्याज नऊ कोटी 50 लाख, इतर जमा 35 लाख रुपये असा निधी विकास कामांना उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

सन 2018-19 चे सुधारीत अंदाजपत्रक 52 कोटी 39 लाख 11 हजार 844 रुपयापर्यंत गेले आहे. आरंभिची शिल्लक 29 लाख 93 हजार 517 रुपये असून 47 कोटी 71 लाख 13 हजार 227 रुपये महसुली जमा असून भांडवली जमा 4 कोटी 38 लाख 51 हजार रुपये असे सुधारीत अंदाजपत्रक देखील यावेळी वाकचौरे यांनी मांडले. विभागनिहाय तरतूदी- अ -प्रशासन 1 कोटी 60 लाख 82 हजार 900, सामान्य प्रशासन- 98 लाख 54 हजार, शिक्षण- 1 कोटी 17 लाख 3 हजार, बांधकाम उत्तर- 5 कोटी 9 हजार, बांधकाम दक्षिण- 6 कोटी 6 लाख 61 हजार 517, लघु पाटबंधारे- 1 कोटी, ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती – 3 कोटी, आरोग्य- 52 लाख 50 हजार, कृषी- 2 कोटी 16 लाख 1 हजार, पशुसंवर्धन- 2 कोटी 66 लाख 50 हजार, समाजकल्याण- 3 कोटी 53 लाख, ग्रामपंचायत- 9 कोटी 8 लाख 2 हजार, महिला व बालकल्याण- 1 कोटी 77 लाख.

यंदा शिक्षण, बांधकाम दक्षिण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन व महिला व बालकल्याण विभागाच्या तरतूदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यावेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत योजनेसाठी पाच लाख तरतूद करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)