ट्रॅक्‍टरची धडकेने निमगाव वाघातील युवतीचा मृत्यू

नगर – पिंपळगाव वाघा ते निमगाव वाघा रोडवर ट्रॅक्‍टरने पायी चालणाऱ्या युवतीला धडक बसल्याने त्याच तिचा मृत्यू झाला आहे. दिपाली नानाभाऊ जाधव (वय 18, रा. निमगाव वाघा शिवार, ता. नगर) असे मयत झालेल्या युवतीचे नाव आहे.

दिपाली हिचे वडील नानाभाऊ यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्‍टरचालक अरुण संभाजी कापसे (रा. निमगाव वाघा, ता. नगर) याच्याविरोधात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. दिपाली ही पायी चालली होती. त्याचवेळी तिच्यामागून अरुण हा ट्रॅक्‍टर घेऊन येत होते.

अरुण याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ट्रॅक्‍टर चालविला. त्यातच त्याचे ट्रॅक्‍टरवरील नियंत्रण सुटले. पुढे पायी जात असलेल्या दिपाली हिला ट्रॅक्‍टरने जोराची धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. यातच तिचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. 2) झालेल्या या अपघाताची नोंद पोलिसांनी बुधवारी (ता. 6) घेतली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)