दिव्यांगांना ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी ठरतेय गैरसोयीची!

नगर – दिव्यांग ओळखपत्र देण्याची प्रक्रिया “स्वावलंबन’ प्रणालीद्वारे ऑनलाईन केली करण्यात आली. मात्र, यासंदर्भात दिव्यांगांना फारशी माहिती नसल्याने आणि जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला नसल्याने दिव्यांगांची गैरसोय होत आहे.

दिव्यांग व्यक्‍तींना एकूण 21 प्रकारच्या दिव्यांगत्व प्रकाराबाबत दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्यात येते. यामध्ये दृष्टिदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहूदिव्यांगता, शारीरिक वाढ खुंटणे, मेंदुचा पक्षाघात, स्नायुंची विकृती, स्वमग्नता, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, वाचा व भाषा दोष, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ऍसीड ऍटॅक व्हिक्‍टिम, कुष्ठरोग, दृष्टिक्षीणता आदी 21 प्रकारातील दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात केले जाते. दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी संबंधित व्यक्‍तीला संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्‍तीला प्रत्यक्ष जाऊन त्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता यावा, यासाठी स्वतंत्र कक्ष असणे आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा रुग्णालयाकडून दिव्यांग ओळखपत्र मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी स्वावलंबनकार्ड. संकेतस्थळावर स्वत:ची वैयक्तिक अचूक माहिती भरून नोंदणी करावी. त्यानंतर प्राप्त होणारी प्रत जिल्हा रुग्णालयात संबंधित विभागाच्या बोर्डच्या दिवशी घेवून यावी व आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. परंतू, ऑनलाईन नोंदणीसंदर्भात स्वतंत्र कक्ष नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)