हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस

File photo

पुरावे द्या, अन्यथा लेखी माफी मागा

पारनेर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेवून उपोषण करतात, असा आरोप केला होता.त्याबाबत हजारे यांच्यावतीने बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठविण्यात आली आहे. पुरावे द्या अन्यथा लेखी माफी मागा असे या नोटीशीत हजारे यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हजारे संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता. त्यावर हजारे यांच्या समर्थकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गुरूवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हजारे यांनी भेटही नाकारली होती. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली होती. मलिक यांच्या त्या वक्तव्याशी पक्षाचा काही संबंध नाही. यामुळे हजारे दुखावले गेल्याने आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे पवार म्हणाले.

मात्र, नवाब मलिक यांनी यावर कोणतेही मत व्यक्त केले नाही. त्यामुळे हजारे यांची वकील मिलिंद पवार यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या नोटीशीत त्यांनी म्हटले आहे की,लोकपाल व लोकआयुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संमत होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक हजारे हे राळेगणसिध्दी येथे 30 जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणासाठी संत यादवबाबा मंदिरात बसले आहेत.

मलिक यांनी केलेल्या वक्तव्या विषयी कुठलाही खुलासा केलेला नाही. त्यामुळे ते वक्तव्य त्यांचे वैयक्तिक होते किंवा पक्षाचे होते तसेच मलिक यांच्याकडे कुठलाही पुरावे नसताना धादांत खोटे व बदनामीकारक व्यक्तव्य होते. फक्त राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक हजारे यांच्या विषयी बदनामी करण्याचे उद्देशाने व अण्णांविषयी समाजात चुकीचा समज निर्माण व्हावा म्हणून मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवून हजारे यांची मलिक यांनी जाहीर लेखी माफी मागावी व तसा खुलासा करावा तसे न केल्यास फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे खटले व दावे मलिक यांच्या विरोधात दाखल करावे लागतील, असा इशारा कायदेशीर नोटीस रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून मलिक यांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)