चार वाहनांच्या विचित्र अपघात राहुरीचे दोन जण जागीच ठार

file photo

सुपा – नगर – पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्‍यातील जातेगाव घाटात चार वाहनांच्या विचित्र अपघातात राहुरीमधील दोन जण जागीच ठार झाले. गुरुवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत सुभाष नामदेव ढोरमले यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सुपा पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुभाष ढोरमले यांचे जातेगाव घाटाजवळ हॉटेल समाधान आहे. गुरुवारी सकाळी 6.30 वाजता सुमारास मारूती कार क्रमांक (एम.एच 16. बीवाय 6097) घेवून हॉटेलकडे जात असतांना जातेगाव घाट उतरत होते. घाटाच्या शेवटच्या वळणाजवळ मिनीबस थांबल्याने ढोरमले यांनी आपली कार थांबविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाठीमागून येणारी लक्‍झरी बसची क्रमांक ( एमपी. 9 एफ ए 0045) कारला पाठीमागून धडक बसून ती थांबली. त्याचवेळी लक्‍झरी बसच्या पाठीमागे असलेल्या दुसऱ्या कार देखील क्रमांक (एमएच. 17 एजे 2507) लक्‍झरी बसला पाठीमागून धडली. ही धडक होत न होतेच तो कारच्या पाठीमागे असलेल्या मालट्रकची क्रमांक (एमएच-16. क्‍यू.19 47) दुसऱ्या कारला पाठीमागून जोराची धडक बसली.

या कारला ट्रक जोराची धडक असल्याने ही कार पुढे असलेल्या लक्‍झरी बसमध्ये घुसली. त्यामुळे या कारमधील भास्कर रंगनाथ डावखर (वय-60) व प्रसाद रावसाहेब उंडे (वय-32 दोघे रा.राहूरी) हे कारमध्ये अडल्याने गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघात मालट्रक व लक्‍झरी बस चालकांमुळे झाला असल्याने या चालकांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान,अपघाताची माहिती समजताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत मयतांना बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक संजयकुमार सोने यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. धामणे, अडकित्ते हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)