‘जेनेरिक’च्या 80 औषधांवर बंदी

नगर – रुग्णांना स्वस्त औषध सेवा देणाऱ्या जेनेरिक औषधांमधील 80 औषधांचे प्रयोग धोकादायक असल्याच्या कारणावरुन हे औषध केंद्रीय आरोग्य विभागाच्या समितीने दिलेल्या अहवालानंतर बंद करण्यात आले आहेत. चार ते पाच ड्रग एकत्रित करून निर्मिती करण्यात आलेल्या या कॉम्बिनेशन औषधांचा वापर घातक असल्याने जेनेरिकच्या 80 औषधांची निर्मिती आणि विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

सर्दी, ताप, पोटदुखी, उलटी, सांधेदुखी या आजारावर जेनेरिक औषधं उपलब्ध असून, या औषधांचा प्रयोग करणे सुरक्षित नसल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाच्या समितीमध्ये समोर आल्यानंतर या 80 जेनेरिक औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. फिक्‍स डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) असणाऱ्या औषधांमध्ये अधिक प्रमाणात ऍन्टीबायोटीक औषधांचा समावेश असल्याने आणि यामधील काही औषधे शरीरासाठी धोकादायक असल्याने या औषधांवर बंदी लादण्यात आली आहे. एफडीसी अंतर्गत असलेल्या 300 पेक्षा अधिक औषधांवर प्रतिबंध घालण्यात आले असून, त्यानंतर आता जेनेरिकच्या 80 औषधांवर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये सर्दी, ताप, पोटदुखी, सांधेदुखी व उलटी यासारख्या औषधांचा समावेश आहे. स्वस्तात मिळत असलेली ही औषधे रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या औषधांची तपासणी सुुरू केली आहे. जेनेरिक मेडिकल स्टोअर्समधूनच ही औषधे मोठया प्रमाणात विक्री करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. जेनेरिक औषधांचा वार्षिक व्यवसाय हा तब्बल 900 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे. या व्यावसायावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

काय आहे फिक्‍स डोस कॉम्बिनेशन

फिक्‍स डोस कॉम्बिनेशन औषधांमध्ये चार ते पाच घटक असलेले ड्रग ऍन्टीबायोटीक म्हणून वापरण्यात येतात. विविध घटक एकत्रित करून सर्दी, ताप, पोटदुखीसह काही आजारांवर वापरण्यात येत असलेल्या औषधांमध्ये प्रमाणाचा अतिरेक होत असल्याने ते शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे फिक्‍स डोस कॉम्बिनेशनच्या या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)