जिजामाता पब्लिक स्कूलचे पाच खेळाडू जिल्हा पातळीवर 

भेंडे (ता. नेवासे) : येथील जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना मान्यवर. (छाया : संतोष सोनवणे)

भेंडे – क्रीडा युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने यश अकॅडमी सोनई येथे आयोजित पावसाळी शालेय मैदानी स्पर्धेत भेंडा बु. येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कूलच्या पाच खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड झाल्याची माहिती प्राचार्य दिनकराव टेकणे यांनी दिली.

त्यामध्ये 17 वयोगटात प्रसाद सतरकर थाळीफेक (प्रथम), आकाश चव्हाण गोळाफेक (प्रथम), 14 वयोगटात संकेत म्हस्के 200 मीटर धावणे (द्वितीय), जयश्री कदम थाळीफेक (द्वितीय), ताके प्रणोती लांब उडी (द्वितीय) तर 14 वयोगटात 100 बाय 4 रिलेमध्ये निखील दहातोंडे, अमन चव्हाण, हर्षद जंगले, संकेत म्हस्के यांनी (द्वितीय) क्रमांक पटकविला.
यशस्वी खेळाडूंना प्राचार्य दिनकरराव टेकणे, उपप्राचार्य दीपक राऊत, क्रीडा शिक्षक विजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुदीप खरात, सोपान नरोटे, सारिका माळवे हीना शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. नरेंद्र घुले, मा. आ. चंद्रशेखर घुले, मा. आ. पांडुरंग अभंग, ऍड. देसाई देशमुख, काशिनाथ नवले, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, वित्त विभागाचे अर्जुनराव गायकवाड, क्रीडा समितीचे अध्यक्ष राजगुरू यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)