माकामध्ये खुलेआम खेळला जातोयं मटका, जुगार

File Photo

ग्रामपंचायतीचे गाळेच झाले अड्डे; पोलिसांचे दुर्लक्ष

नेवासे – नेवासे तालुक्‍यातील माका गावात अवैध व्यावसाय जोमात सुरू आहेत. कोणाचाही धाक नसल्याने खुलेआम मटका व जुगार खेळला जात आहे. बसस्थानकाच्या मागे, मराठी शाळेजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या गाळ्यात जुगार खेळला जात असून पोलिसांच्या आर्शीवादामुळे ग्रामस्थांना याअवैध व्यवसायाच्या विरोधात कोणाला दाद मागावी असा प्रश्‍न पडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील माका हे शेवगाव-पांढरीपूल या रस्त्यावर असून शेवगाव- पाथर्डी – नेवासा या तीन तालुक्‍याच्या सीमेवर हे गाव. या गावाला आठ – दहा खेड्याचा संपर्क असल्याने येथील बाजारपेठेत कायमच वर्दळ असते. याठिकाणी चक्क ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे अवैध व्यवसाय चालू आहेत.पोलिसांना हे माहित असूनही सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी या गावात हजेरी लावून जातात. अर्थात बाजारच्या दिवशी गावात हे पोलीस कर्मचारी येतात. काही ठराविक ठिकाणी भेटी देवून हे कर्मचारी निघुन जातात.

गावात अवैध व्यवसाय जोमाने सुरू असल्याने कायदा व सुवस्थेचा प्रश्‍न देखील गंभीर झाला आहे. दररोज किरकोळ कारणावरून भांडणे, मारामाऱ्या होत आहे. हे देखील पोलीस मिटविण्याचा उद्योग करीत असल्याने आता न्याय कोणाला मागावा असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे.

या गावात बनावट दारू, मटका जुगार खुलेआम चालू असल्याने येथील महिलांची कुंचबना होत आहे. बसस्थानकाच्या मागे मराठी शाळेच्या अवतीभवती दारू मटका जुगार खुलमआम सुरु आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या गाळ्यात देखील जुगाराचा रोजच मोठा अड्डा सुरु असतो. याठिकाणी बाहेरील नागरिक जुगार खेळण्यासाठी येत असल्याने गावात नेहमीच गर्दी असते. तालुक्‍यात माका गावात वाढत चालेल्या अवैध व्यवसायाची जोरदार चर्चा आहे. मात्र पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. या विरोधात ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)