नगरच्या बाजारापेठेतील अतिक्रमणे हटवली

नगर –  महापालिकेने शहरातील मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या अतिक्रमणांविरुद्ध जोरदार कारवाई केली. रस्त्यावर आलेली अतिक्रमणे आज फक्त हटविण्यात आली. रस्त्यावर उद्या (मंगळवारी) पुन्हा अतिक्रमण दिसल्यास, त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.

शहरातील अतिक्रमणांवर महापालिकेकडून चार दिवसांपासून कारवाई सुरू आहे. शनिवारी केलेल्या कारवाईत महापालिकेने लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले होते. त्याचप्रमाणे रस्त्यावरील हातगाड्या, शेड, प्लास्टिक पत्र आदी, असे दोन डंपर भरून साहित्य जप्त केले. या वेळीच मोहीम तीव्र होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज तीव्र कारवाई करत त्यात सातत्य ठेवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील मुख्य बाजारपेठ कापडबाजार, मोचीगल्ली, गंजबाजार, घासगल्ली आणि जीपीओ चौकातील अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना त्यांचे साहित्य काढून घेण्यास सांगण्यात आले होते. उद्या मंगळवारी पुन्हा अतिक्रमण दिसल्यास साहित्य जप्त करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.गंजबाजारातील प्रमुख रस्ते अतिक्रमणांखाली गेले होते. तेथील अतिक्रमण हटल्याने रस्ते मोठे आणि रुंद दिसत होते. वाहनधारक आणि पादचारी हा रस्ता पाहून अशी परिस्थिती कायम राहिल का, अस प्रश्‍न करत होते.

पथकाचा डंपर नादुरूस्त

अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू करतानाच त्यांचा डंपर नादुरूस्त झाला. त्यामुळे त्यांना अतिक्रमणधारकांचे साहित्य उचलता येत नव्हते. याचा फायदा अतिक्रमणधारकांना झाला. पथकाने अतिक्रमणधारकांना तंबी देत कारवाई साधून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)