माणिकनगर परिसर खाजगी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ

(1) माणिकनगर परिसरात पडलेल्या कचऱ्यांमुळे दुर्गंधी सुटली होती. (2) माणिकनगर परिसरातील कचरा उचलल्यानंतर स्वच्छ झालेले परिसर.

सुमित वर्मा यांचा पुढाकार – मनपाने दाद न दिल्याने नागरिकांच्या सहकार्याने उचलले पाऊल

नगर – माणिकनगर येथील स्वच्छतेकडे महापालिकेचे असलेले दुर्लक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी आज कृतीतून दाखवून दिले. अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले होते. डास उत्पत्ती वाढून इतर कीटकांचा प्रादूर्भाव देखील वाढला होता. त्यासाठी मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी स्वतः पुढाकार घेत माणिकनगर आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर शहरातील उच्चभ्रूची वसाहत म्हणून माणिकनगरचा परिसर ओळखला जातो. या परिसरात पडणारा कचरा उचलण्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. अनेक दिवसांपासून कचरा पडून राहत असल्याने दुर्गंधी देखील सुटली होती. नागरिकांच्या आरोग्याला या कचार धोका निर्माण करू लागला होता. रोगराई, डास उत्पत्ती वाढली होती. यातून व्हायरल इन्फेक्‍शनसारख्या आजारांना निमंत्रण मिळू लागले होते.

नागरिकांच्या सेवेसाठी आपण तत्पर आहोत. नागरिकांनी देखील सहकार्य करावे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. माणिकनगरच्या विकासासाठी नेहमीच पुढे राहिल.
– सुमित वर्मा, जिल्हाध्यक्ष, मनविसे

सर्दी, खोकला, ज्वरसारख्या आजारांनी स्थानिक नागरिक त्रस्त होते. कचरा आणि त्यातील दुर्गंधी हे एकमेव कारण होते. हा कचरा उचलला जावा यासाठी स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता विभागाशी देखील संपर्क साधला होता. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही.

मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांना काही स्थानिक नागरिकांनी भेटून या कचऱ्याकडे लक्ष वेधले. वर्मा यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. वर्मा यांनी शेवटी खाजगी सफाई कामगारांना बोलावून घेत कचरा उचलून घेतला. कचरा उचलला गेल्याने हा परिसर दुर्गंधी मुक्त झाला आहे. नागरिकांनी देखील सुमित वर्मा यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)